ALERT : सावधान! आॅनलाईन डेटिंग अॅप वापरताय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2017 18:42 IST2017-03-26T13:12:32+5:302017-03-26T18:42:32+5:30
सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट ‘नॉर्टन’च्या सर्वेनुसार आॅनलाईन डेटिंग अॅप वापरणाऱ्याना सिक्युरिटी प्रॉब्लेम्सना सामोरे जावे लागू शकते, अशी धक्कादायक गोष्ट समोर आली आहे.
.jpg)
ALERT : सावधान! आॅनलाईन डेटिंग अॅप वापरताय?
स यबर सिक्युरिटी एक्सपर्ट ‘नॉर्टन’च्या सर्वेनुसार आॅनलाईन डेटिंग अॅप वापरणाऱ्याना सिक्युरिटी प्रॉब्लेम्सना सामोरे जावे लागू शकते, अशी धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. जवळपास ५९ टक्के स्मार्टफोन यूजर्स सध्या आॅनलाईन डेटिंगचा वापर करीत आहेत, त्यामुळे त्यांच्या सिक्युरिटीचा प्रश्न मोबाइल कंपन्यांना सतावत आहे.
‘नॉर्टन’च्या सर्वेनुसार फेबु्रवारी महिन्यात व्हॅलेंटाईनशी संबंधीत रोमॅँटिक थीम, लव्ह मीटर टेस्ट, गीटिंग व गेम्स आदी अॅप्सचा वापर जास्त करण्यात आला. त्यादरम्यान करण्यात आलेल्या सर्वेनुसार ही बाब समोर आली आहे.
भारतात डेटिंग बेस्ड सोशल नेटवर्किंग साईट्सचा वापर वेगाने वाढत आहे. अनेकजण काही मर्यादित काळासाठी असे अॅप वापरुन अनइन्स्टॉल करतात. सायबर क्रिमिनल्स याच गोष्टीचा फायदा घेतात आणि यूजर्सचा इंटरेस्ट पाहून आॅफर देतात.
सिक्युरिटी फर्मच्या सल्ल्यानुसार, अशा कोणत्याही लिंकवर कधीही क्लिक करु नका, जी तुमच्या जुन्या काँटॅक्टच्या माध्यमातून आली असेल. कारण सायबर क्रिमिनल्स अशा काँटॅक्टचा गैरवापर करत असतात. अशा लिंकवर क्लिक केल्यास पॉर्न वेबसाईट किंवा वेबकॅम साईट उघडतात.
अनेकदा अशाही लिंक आॅनलाईन डेटिंग अॅपवर येतात, ज्यावर क्लिक केल्यास व्हायरसचा धोका निर्माण होतो. बँक डिटेल्स, क्रेडिट कार्ड डिटेल्सची चोरी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. ज्यावेळी आॅनलाईन डेटिंग अॅप्स वापरत असाल, त्यावेळी व्हेरिफाईड कंपनीचं अॅप आहे की नाही, हे तपासून पाहिलं पाहिजे.