ALERT : ब्रेकअप झाल्यानंतर सोशल मीडियावर "या" चुका टाळा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2017 15:05 IST2017-03-19T09:35:45+5:302017-03-19T15:05:45+5:30
आपल्या जोडीदारासोबतचा ब्रेकअप सहन न करण्यापलीकडचा असतो. हा धक्का आपल्याला खूप डिस्टर्ब करून जातो. अशावेळी आपले मानसिक संतुलन बिघडते आणि समोरच्या व्यक्तिला त्रास देण्यासाठी जीव उताविळ होतो.

ALERT : ब्रेकअप झाल्यानंतर सोशल मीडियावर "या" चुका टाळा !
कारण काहीही असो, आपल्या जोडीदारासोबतचा ब्रेकअप सहन न करण्यापलीकडचा असतो. हा धक्का आपल्याला खूप डिस्टर्ब करून जातो. अशावेळी आपले मानसिक संतुलन बिघडते आणि समोरच्या व्यक्तिला त्रास देण्यासाठी जीव उताविळ होतो. यासाठी आपण समोरच्याला त्रास देण्यासाठी काहीही प्रयत्न करतो, कुठल्याही माध्यमाचा आधार घेतो. त्यातीलच एक माध्यम म्हणजे सोशल मीडिया होय. या आधारे आपण समोरचा व्यक्ती कसा दु:खी होईल हेच पाहत असतो. मात्र मित्रांनो, अशा वेळी सोशल मीडियावर असे काही करू नका ज्यामुळे लोकांना तुम्हाला बोलायची संधी मिळेल. आपल्या भावना सांभाळून सोशल साईट्सवर असे काहीही टाकू नका ज्यामुळे लोकांना चर्चेसाठी खाद्य मिळेल.
म्हणून सोशल मीडियावर ब्रेकअपच्या आणि जोडीदाराच्या व्यक्तिगत आयुष्याच्या कोणत्याच गोष्टी शिवाय स्नॅपचॅट स्टोरी कदापी शेअर करू नका. वारंवार पोस्ट शेअर केल्याने लोकांच्या लक्षात येते आणि याचा सरळ अर्थ होतो की तुम्ही खूप दु:खी आहात. तसेच सोशल साईटवरील जुन्या आठवणी पाहून दु:खी होण्यात अर्थ नाही. जुने फोटो पाहून किंवा जुन्या आठवणी वाचून फक्त दु:खच होईल.
सोशल मीडियावर कधीही आपल्या दु:खाचे प्रदर्शन करु नका. अनेकांना दुसऱ्यासमोर आपण नॉर्मल असल्याचे दाखवायची सवय असते. या नादात हे लोक स्वत:चे मस्ती करतानाचे फोटो पोस्ट करतात. यावर तुम्हाला सकारात्मक कमेंटच मिळतील असे आवश्यक नाही. तसेच चुकूनही एक्सचे अकाउंट चेक करू नका. यामुळे दु:खाशिवाय काहीच मिळणार नाही. आपल्या एक्सचे प्रोफाईल पाहणेही बंद करा. त्याच्या पोस्ट, लाईक्स व शेअर पाहणे बंद करा. या गोष्टींमुळे तुमच्यात असुरक्षिततेची भावना वाढेल.