विमानात राहणारा हवाईजादा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2016 10:50 IST2016-02-23T17:50:24+5:302016-02-23T10:50:24+5:30

अशा व्यक्तीला काय म्हणाल जो मागची 15 वर्षे विमानात घर करून राहतोय?  ब्रुस कॅम्पबेल असे त्या व्यक्तीचे नाव आहे. 

Airliner | विमानात राहणारा हवाईजादा

विमानात राहणारा हवाईजादा

्यमवर्गीयांसाठी आजही हवाईसफर ही अप्रुपाची गोष्ट आहे. मग तुम्ही अशा व्यक्तीला काय म्हणाल जो मागची 15 वर्षे विमानात घर करून राहतोय?  ब्रुस कॅम्पबेल असे त्या व्यक्तीचे नाव आहे.

boing

1999 साली सेवेतून निवृत्त झालेले बोर्इंग 727 विमान त्याने विकत घेतले आणि 10 एकर जागेवर पोर्टलँड वूड्स भागात पार्क करून तो त्यामध्ये राहू लागला. विमानाला पूर्णपणे घरामध्ये रुपांतरित करण्याची प्रक्रिया आणि त्यामध्ये राहण्याचा अनुभव तो एअरप्लेनहोम डॉट कॉम या वेबसाईटवर शेअर करत असतो.

ब्रुस आता नवीन घराच्या शोधात आहे. त्याला जपानमध्ये असेच एका बोर्इंग विमान घर म्हणून हवे आहे. 1960 दशकांत बोर्इंग विमानांची निर्मिती सुरू झाली होती. केवळ 250 विमान तयार करण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या बोर्इंने 1984मध्ये प्रोडक्शन बंद करतेवेळी 1832 विमानांची निर्मिती केलेली होती.

boing

एका व्यक्तीसाठी बोर्इंग घर म्हणून पुरेसे आहे. छोटे कुटुंबदेखील त्यामध्ये राहू शकते, अशी ब्रुसने माहिती दिली.

Web Title: Airliner