वायू प्रदूषणामुळे मृत्यूचे प्रमाण वाढतेय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2016 02:27 IST2016-02-16T09:15:41+5:302016-02-16T02:27:09+5:30

वायू प्रदूषणामुळे मृत्यूचे प्रमाण वाढतेय! अमेरिकन असोसिएशन फॉर दी अ‍ॅडव्हान्समेंट आॅफ सायन्सचा इशारा वायू प्रदूषणामुळे दरवर्षी जगभरात ५५ लाख लोक मरतात. त्यातील अर्ध्यापेक्षा जास्त बळी तर वेगाने आर्थिक विकास करणाºया भारत आणि चीनमधील आहेत, अशी माहिती एका नवीन संशोधनातून समोर आली आहे. सर्वात जास्त लोकवस्ती असलेल्या भारत आणि चीन या देशातील वायू सर्वात जास्त प्रदूषित आहे. चीनमध्ये कोळसा जाळण्यात आल्याने त्यातून निघणाºया कणामुळे जास्त प्रदूषण होते. या देशात वायू प्रदूषणाने दरवर्षी ३,६०,००० मृत्यू होतात. भारत, चीन, अमेरिका आणि कॅनडा येथील वैज्ञानिकांनी अमेरिकन असोसिएशन फॉर दी अ‍ॅडव्हान्समेंट आॅफ सायन्समध्ये (एएएएस) आपले संशोधन सादर केले. त्यात ही बाब नमूद करण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, वायू प्रदूषणामुळे होणाºया रोगांमुळे भारतात १४ लाख तर चीनमध्ये १६ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. ... म्हणून वाढतेय वायू प्रदूषण वायू प्रदूषण हे मुख्यत्वे, वाहतूक, अचल स्त्रोतांमध्ये होणारे इंधनाचे दहन, कोळसा, लाकुड, वाळलेले गवत यांसारख्या जीवाश्न इंधनाचे जळण, आणि बांधकाम कार्य यामुळे वाढते. मोटार वाहने कार्बन मोनॉक्साईड (ूङ्म), हायड्रोकार्बन्स (ऌउ) व नायट्रोजन आॅक्साईडची (ठड) उच्च पातळी निर्माण करतात. बांधकाम कार्ये, खराब रस्ते व जीवाश्म इंधनांचे ज्वलन, धुळीच्या (पार्टीक्युलेट मॅटर) प्रदूषणासाठी जबाबदार आहेत. निवासी व वाणिज्यिक कार्ये देखिल वायू प्रदूषणास हातभार लावतात. वायू प्रदूषणाचे परिणाम कोणते? नित्कृष्ट दर्जाच्या हवेमुळे मानवी आरोग्यावर परिणाम होतो. प्रामुख्याने, वायू प्रदूषणाचा, शरीराच्या श्वसन यंत्रणेवर आणि हृदय रक्त यंत्रणेवर परिणाम होतो. जरी वायू प्रदूषणासंबंधी व्यक्तिगत प्रतिक्रिया हया प्रदूषकांच्या प्रकारावर अवलंबून असल्या तरी, त्यामुळे व्यक्त होईल इतपत व्यक्तीस धोका निर्माण झाला आहे. वायू प्रदूषणामुळे दीर्घकालीन आरोग्याच्या समस्या उदभवतात. वायू प्रदूषणामुळे उद्भवलेल्या आरोग्य समस्येने, श्वसन क्रियेत अडचणी येणे, दमा, खोकला यांसारखे श्वसन व हृदयासंबंधीचे आजार जडू शकतात. वायू प्रदूषण कसे कमी करता येईल? सुस्थितीत असलेली वाहने चालवून, शक्य असेल तेथे पायी चालून, सायकलचा वापर करुन व सार्वजनिक प्रवासी साधनांचा वापर करुन, तुम्ही वायू प्रदूषण कमी करू शकता. टाकाऊ पदार्थ, केरकचरा, वाळलेले गवत व पाने जाळण्याचे थांबवा. झाडे लावा आणि पर्यावरण हिताची नसलेल्या उत्पादनांची खरेदी टाळा. वायू प्रदूषण कायद्यांना पाठिंबा द्या व त्यांचे पालन करा. जेथे आपण राहतो तेथील वातावरण स्वच्छ व आरोग्यदायी ठेवण्यामध्ये एकमेकास मदत करा.

Air pollution increases death rate! | वायू प्रदूषणामुळे मृत्यूचे प्रमाण वाढतेय!

वायू प्रदूषणामुळे मृत्यूचे प्रमाण वाढतेय!

यू प्रदूषणामुळे मृत्यूचे प्रमाण वाढतेय!
अमेरिकन असोसिएशन फॉर दी अ‍ॅडव्हान्समेंट आॅफ सायन्सचा इशारा

वायू प्रदूषणामुळे दरवर्षी जगभरात ५५ लाख लोक मरतात. त्यातील अर्ध्यापेक्षा जास्त बळी तर वेगाने आर्थिक विकास करणाºया भारत आणि चीनमधील आहेत, अशी माहिती एका नवीन संशोधनातून समोर आली आहे. सर्वात जास्त लोकवस्ती असलेल्या भारत आणि चीन या देशातील वायू सर्वात जास्त प्रदूषित आहे. चीनमध्ये कोळसा जाळण्यात आल्याने त्यातून निघणाºया कणामुळे जास्त प्रदूषण होते. या देशात वायू प्रदूषणाने दरवर्षी ३,६०,००० मृत्यू होतात. भारत, चीन, अमेरिका आणि कॅनडा येथील वैज्ञानिकांनी अमेरिकन असोसिएशन फॉर दी अ‍ॅडव्हान्समेंट आॅफ सायन्समध्ये (एएएएस) आपले संशोधन सादर केले. त्यात ही बाब नमूद करण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, वायू प्रदूषणामुळे होणाºया रोगांमुळे भारतात १४ लाख तर चीनमध्ये १६ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.
... म्हणून वाढतेय वायू प्रदूषण
वायू प्रदूषण हे मुख्यत्वे, वाहतूक, अचल स्त्रोतांमध्ये होणारे इंधनाचे दहन, कोळसा, लाकुड, वाळलेले गवत यांसारख्या जीवाश्न इंधनाचे जळण, आणि बांधकाम कार्य यामुळे वाढते. मोटार वाहने कार्बन मोनॉक्साईड (ूङ्म), हायड्रोकार्बन्स (ऌउ) व नायट्रोजन आॅक्साईडची (ठड) उच्च पातळी निर्माण करतात. बांधकाम कार्ये, खराब रस्ते व जीवाश्म इंधनांचे ज्वलन, धुळीच्या (पार्टीक्युलेट मॅटर) प्रदूषणासाठी जबाबदार आहेत. निवासी व वाणिज्यिक कार्ये देखिल वायू प्रदूषणास हातभार लावतात.
वायू प्रदूषणाचे परिणाम कोणते?
नित्कृष्ट दर्जाच्या हवेमुळे मानवी आरोग्यावर परिणाम होतो. प्रामुख्याने, वायू प्रदूषणाचा, शरीराच्या श्वसन यंत्रणेवर आणि हृदय रक्त यंत्रणेवर परिणाम होतो. जरी वायू प्रदूषणासंबंधी व्यक्तिगत प्रतिक्रिया हया प्रदूषकांच्या प्रकारावर अवलंबून असल्या तरी, त्यामुळे व्यक्त होईल इतपत व्यक्तीस धोका निर्माण झाला आहे. वायू प्रदूषणामुळे दीर्घकालीन आरोग्याच्या समस्या उदभवतात. वायू प्रदूषणामुळे उद्भवलेल्या आरोग्य समस्येने, श्वसन क्रियेत अडचणी येणे, दमा, खोकला यांसारखे श्वसन व हृदयासंबंधीचे आजार जडू शकतात.
वायू प्रदूषण कसे कमी करता येईल?
सुस्थितीत असलेली वाहने चालवून, शक्य असेल तेथे पायी चालून, सायकलचा वापर करुन व सार्वजनिक प्रवासी साधनांचा वापर करुन, तुम्ही वायू प्रदूषण कमी करू शकता. टाकाऊ पदार्थ, केरकचरा, वाळलेले गवत व पाने जाळण्याचे थांबवा. झाडे लावा आणि पर्यावरण हिताची नसलेल्या उत्पादनांची खरेदी टाळा. वायू प्रदूषण कायद्यांना पाठिंबा द्या व त्यांचे पालन करा. जेथे आपण राहतो तेथील वातावरण स्वच्छ व आरोग्यदायी ठेवण्यामध्ये एकमेकास मदत करा.

Web Title: Air pollution increases death rate!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.