आई-वडीलांच्या भांडणांचा मुलांवर दुष्परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2016 22:30 IST2016-04-22T17:00:28+5:302016-04-22T22:30:28+5:30

कोणत्या ना कोणत्या कारणावरून आई -वडील भांडत असतील तर मुलांच्या मनावर वाईट परिणाम होतो.  

The adverse consequences of the parents of the parents of the parents | आई-वडीलांच्या भांडणांचा मुलांवर दुष्परिणाम

आई-वडीलांच्या भांडणांचा मुलांवर दुष्परिणाम

लांच्या विकासासाठी घरात शांतता आणि संस्कारमय वातावरण असले पाहिजे. पण, जर कोणत्या ना कोणत्या कारणावरून आई -वडील भांडत असतील तर मुलांच्या मनावर वाईट परिणाम होतो.  

मुले जेव्हा आई-वडीलांना भांडतांना पाहतात तेव्हा ते त्यांना पाहूनच भांडण करायला शिकतात. मुलांना त्यांचे निरागस भावविश्व या आई वडीलांच्या भांडणांमुळे गमवावे लागते. यामध्ये आई-वडीलांनीही त्यांच्या मनाचा विचार करायला हवा.

त्यांच्यासमोर कधीही भांडण केले नाही पाहिजे. तुमच्यात काही वाद असतील तर चार भिंतींच्या आतच ती मिटवायला हवी. याचा दुरगामी परिणाम असाही आहे की, ते खुप कमी वयात स्वत:ला सावरतात आणि त्यांचे निरागस बालमन हरवून बसतात. त्यांच्या मानसिक तेवरही परिणाम होतो.

आई-वडीलांची भांडणे पाहून मुले नैराश्यात जाण्याची शक्यता असते. नेहमी त्यांना कशाची तरी भीती ही वाटतच असते. कधी आई-वडील भांडतील आणि आपल्याला मारतील असे काहीही विचार त्यांच्या मनात येतात. घरात जर नेहमी चिंतेचे, भांडणाचे वातावरण असेल तर लहान मुलेही मानसिकदृष्ट्या अस्थिर होऊ न जातात.

त्यांनाही आपण काय करावे हे कळत नाही. कधीकधी त्यांना असेही वाटते की, आपण आपल्या आईवडीलांना जड झालो आहोत म्हणून ते आपल्याला अशी वागणूक देतात. आई-वडीलांच्या भांडणाचे कारण ते स्व:लाच समजतात. कोणत्याच व्यक्तीवर त्यांचा विश्वास उरत नाही. प्रत्येक  व्यक्ती त्याला वाईट आणि भांडणाराच वाटू लागतो.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ते चिडचिडे होतात. त्यांना वाटते की, परिस्थिती आपल्या हातात नाही. ते परिस्थितीसमोर हतबल होतात आणि इप्सित साध्य प्राप्त न करू शकल्याने रागीट होतात.

Web Title: The adverse consequences of the parents of the parents of the parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.