​‘फ्रेंड झोन’मध्ये असण्याचा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2016 19:01 IST2016-05-05T13:31:41+5:302016-05-05T19:01:41+5:30

जे लोक अधिकाधिक काळापासून मित्र होते त्या कपल्समध्ये दोन्ही जोडीदार दिसण्याच्या बाबातील एकमेकांपासून एकदम भिन्न होते.

The advantage of being in the 'Friend Zone' | ​‘फ्रेंड झोन’मध्ये असण्याचा फायदा

​‘फ्रेंड झोन’मध्ये असण्याचा फायदा

ुणाईच्या शब्दावलीमधील परवलीचा शब्द म्हणजे ‘फ्रेंड झोन’. आपल्या आवडत्या व्यक्तीच्या ‘फें्रड झोन’मध्ये येण्याची अनेक मुला-मुलींना भीती वाटते. आपल्याकडे याला ‘कंधा’ होणे म्हणतात.

म्हणजे एखादी मुलगा/मुलगी तुम्हाला खूप आवडते पण तो/ती तुम्हाला केवळ मित्र म्हणूनच पाहतो/पाहते. आॅकवर्ड ना! तुम्ही जर अशाच ‘कोणा’च्या फ्रेंड झोनमध्ये असाला तर घाबरू नका.

सामान्यपणे आपण आपल्या तोडीसतोड जोडीदाराचीच निवड करत असतो. आपल्याला शोभून दिसणारा, शारीरिकदृष्ट्या (उंची, रंग, बांधा) आपल्याशी मिळताजुळत्या लोकांशीच आपले प्रेमसंबंध जुळत असतात.

मात्र तुम्हाला कधी एखाद्या कपलकडे पाहून असे वाटले का, की एक जोडीदार दुसऱ्यापेक्षा कितीतरी पटीने सुंदर/चांगला आहे. मग यांची जोडी कशी जमली? याचे उत्तर आहे ‘फ्रेंड झोन’.

अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठ आणि नॉर्थवेस्टर्न विद्यापीठाने 267 विरुद्धलिंगी कपल्सना विचारले की,  रिलेशनशिप सुरू होण्याआधी तुम्ही एकमेकांना कधीपासून ओळखत होते.

अध्ययनाअंती असे निष्कर्ष समोर आले की, जे लोक अधिकाधिक काळापासून मित्र होते त्या कपल्समध्ये दोन्ही जोडीदार दिसण्याच्या बाबातील एकमेकांपासून एकदम भिन्न होते. 

Web Title: The advantage of being in the 'Friend Zone'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.