अडेलला कोसळले रडू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2016 05:41 IST2016-02-20T12:41:41+5:302016-02-20T05:41:41+5:30
ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात साउंडमध्ये गडबड असल्याने परफॉर्मन्स देवू न शकलेली गायिका अडेल दिवसभर रडत होती. सोहळ्यात अडेल ‘आॅल आई आस्क’ हे गाणे सादर करणार होती.

अडेलला कोसळले रडू
मात्र पियानोमध्ये गडबड असल्याने तिचा आवाज अतिशय बेसुर असा ऐकु येत होता. आवाजातील चढ-उतारामुळे तीला परफॉर्मन्स करताना बºयाचशा अडचणी येत होत्या. अखेर तिला परफॉर्मन्स न करताच स्टेजवरून खाली उतरावे लागले. मात्र यामुळे अडेल चांगलीच निराश झाली. ती दिवसभर रडत होती.