अ‍ॅक्सेसरीजमध्येही भर घालतो स्कार्फ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2016 17:18 IST2016-04-20T11:48:54+5:302016-04-20T17:18:54+5:30

टी-शर्ट-जीन्स वा फॉर्मल शर्ट-ट्राउझर्सवर छोटे स्कार्फच उठून दिसतात.

Adds scarves to accessories | अ‍ॅक्सेसरीजमध्येही भर घालतो स्कार्फ

अ‍ॅक्सेसरीजमध्येही भर घालतो स्कार्फ

क बदलणा-या फॅशनेबल अ‍ॅक्सेसरीजमध्ये भर घालतो तो स्कार्फ! तशी तर स्कार्फची फॅशन काही नवी नाही. पण प्रिंटेट, जरी वर्क, एम्ब्रॉयडरी असलेले असे कधी गडद तर कधी फिकट रंगसंगतीचे आकर्षक स्कार्फ गळ्याभोवतीच्या फॅशनमधून वाट काढत जेव्हा पर्स, बॅगच्या बेल्टलाही गुंडाळले जातात, तेव्हा ती होते हटके फॅशन. त्यामुळे स्कार्फलाही वेगळा लूक येतो आणि आपल्या एकूणच व्यक्तिमत्त्वालाही स्टायलिश लूक मिळतो.   

आपण किती ‘फॅशन फॉलोअर’ आहोत हे सांगणा-या या सा-या गोष्टी. आताशा आपल्या कपडयांना साजेसा असा स्कार्फ घेण्याबरोबरच तो आपल्या महागड्या बॅग किंवा पर्सवरही कसा शोभून दिसेल, याकडे अधिक लक्ष दिले जाते. स्कार्फमध्ये पूर्वी दुपट्ट्याएवढ्या लांब असणा-या स्कार्फपासून ते अगदी टायप्रमाणे, पण गळ्याभोवती थोडसं तिरके बांधू शकतो अशा आकारापर्यंत हे स्कार्फ बाजारात उपलब्ध असायचे. लेगिन्स-कुर्ता, जीन्स-टॉप, जीन्स-कुर्ता अशा ड्रेसिंगवर तर मोठ्या आकाराचे स्कार्फ छान दिसतात. 

टी-शर्ट-जीन्स वा फॉर्मल शर्ट-ट्राउझर्सवर छोटे स्कार्फच उठून दिसतात, आणि असे स्कार्फ बॅग वा पर्सला अधिक स्टायलिश पद्धतीने बांधताही येतात.फॅशन आणि सध्याच्या दृष्टीने संरक्षण, असा दुहेरी फायदा.

Web Title: Adds scarves to accessories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.