आता तैमूरमुळे नाही तर, जीन्समुळे करिना कपूर खान चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 14:53 IST2019-04-11T14:52:26+5:302019-04-11T14:53:17+5:30
सध्या बॉलिवूची बेबो म्हणजेच करिन कपूर खान आपल्या आगळ्या वेगळ्या फॅशन स्टाइलमुळे चर्चेत आली आहे. साधारणतः तैमूरमुळे लाइमलाइटमध्ये असलेली करिना सध्या आपल्या हटके स्टाइल आणि फॅशन सेन्समुळे चर्चेत आहे.

आता तैमूरमुळे नाही तर, जीन्समुळे करिना कपूर खान चर्चेत
सध्या बॉलिवूची बेबो म्हणजेच करिन कपूर खान आपल्या आगळ्या वेगळ्या फॅशन स्टाइलमुळे चर्चेत आली आहे. साधारणतः तैमूरमुळे लाइमलाइटमध्ये असलेली करिना सध्या आपल्या हटके स्टाइल आणि फॅशन सेन्समुळे चर्चेत आहे. काही दिवसांपासून करिना आपल्या फॅशनेबल आउटफिट्स आणि वन पीस सोडून वेगवेगळ्या स्टाइल शर्ट्स आणि जीन्समध्ये दिसून येते. करिनाने वेअर केलेली फ्लेयर्ड जीन्स (flared jeans) सध्या चर्चेचा विषय बनत आहे. करिनाचा ही स्टाइल तुम्हीही कॉपी करू शकता.
रिप्ड जीन्स असो किंवा जॅकेट्स, करिना कोणतंही आउटफिट कॉन्फिडंटली ट्राय करते. आपल्या ड्रेसिंग सेन्सने ती अनेकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. तुम्हीही करिनाप्रमाणे शर्ट आणि जीन्स कॅरी करू शकता. जर तुम्हाला करिनाप्रमाणे शर्ट आणि जीन्समध्ये हटके दिसायचं असेल तर तिच्याप्रमाणे शर्ट टक-इन करून वेअर करा. यामुळ तुमच्या बॉडिची परफेक्ट फिगर आउटफिटमधून दिसून येते. त्यामुळे तुम्ही आणखी सुंदर दिसता.
करिनाचा हा संपूर्ण लूक करायचा विचार करत असाल तर तुम्हीही तिच्याप्रमाणे गॉगल्स वेअर करू शकता. पण लक्षात ठेवा की, गॉगल्सची निवड करताना ते तुमच्या चेहऱ्याच्या आकारानुसार असतील याची काळजी घ्या. नाहीतर त्यामुळे तुमचा लूक बिघडू शकतो.
जर तुम्ही कार्गो पॅन्ट वेअर करण्याचा विचार करत असाल. परंतु त्यामध्ये तुम्ही कशा दिसाल, या विचारने त्रस्त असाल. तर तुम्ही करिना कडून टिप्स घेऊ शकता. करिनाने ग्रीन कलरची कार्गो व्हाइट कलरच्या डीप नेक शर्टसोबत वेअर केली आणि त्याचबरोबर फ्लॅट स्लिपर्स मॅच केले होते. या लूकमध्येही करिना फार सुंदर दिसत होती. यावरही करिनाने ब्लॅक कलरचे गॉगल्स वेअर केले होते.
फ्लेयर्ड जीन्स ट्राय करण्याचा विचारात असाल तर हाय हिल्ससोबत कॅरी करा. याव्यतिरिक्त तुम्ही जीन्स लॉन्ग कोट किंवा टॉप-टीशर्टसोबत कॅरी करू शकता.
अनेक नवख्या अभिनेत्रींनाही करिना आपल्या फॅशन स्टाइलने मागे टाकत आहे. याव्यतिरिक्त करिना अनेकदा आपल्या आउटफिट्ससोबत एक्सपरिमेंट करताना दिसते.