‘लेडी आॅफ दी हर्ले’चे अपघाती निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2016 17:08 IST2016-04-13T00:04:46+5:302016-04-12T17:08:59+5:30
‘लेडी आॅफ दी हर्ले’ या उपाधीने गौरविण्यात आलेली देशातील सुप्रसिद्ध बाईक राईडर वीनू पालीवाल हिचे काल सोमवारी अपघाती निधन झाले.

‘लेडी आॅफ दी हर्ले’चे अपघाती निधन
य दा ‘लेडी आॅफ दी हर्ले’ या उपाधीने गौरविण्यात आलेली देशातील सुप्रसिद्ध बाईक राईडर वीनू पालीवाल हिचे काल सोमवारी अपघाती निधन झाले. मध्यप्रदेशातील विदीशा जिल्ह्याच्या ग्यारसपूर गावानजिक तिच्या बाईकला अपघात झाला. ३० वर्षांची विनू तिचा सहकारी दीपेश तंवर याच्यासोबत काश्मीर ते कन्याकुमारी बाईक राईडवर निघाली होती. काल पहाटे विनू व दीपेश दोन वेगवेगळ्या हर्ले डेव्हिडसन बाईकवर लखनौवरून भोपाळकडे रवाना झाले होते.याचदरम्यान ग्यारसपूर गावानजिक वीनूची बाईक रस्त्यावरून घसरली आणि तिला अपघात झाला. गंभीर अवस्थेत तिला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले आणि त्यानंतर विदिशा येथील रूग्णालयात हलवत असतानाच रस्त्यातच वीनूची प्राणज्योत मालवली.
![]()