अबब... उलटं घर बांधल का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2016 07:55 IST2016-02-26T14:55:25+5:302016-02-26T07:55:25+5:30
अनेक जण आपल्या स्वप्नाचे घर बांधण्यासाठी आपली सारी कमाई खर्ची घालतात. सुंदर घर हे साºयांचे स्वप्नच असते. मात्र तैवानमधे चक्क उलट घर बांधल आहे.

अबब... उलटं घर बांधल का?
तैवानमधील तायपेई येथे या उलट्या घराची निर्मिती करण्यात आली आहे. तीन माळ्यांच्या या घरात सर्वच्या सर्व गोष्टी उलट्या लटकवण्यात आल्या आहेत. जेवणाचा टेबल, खुर्च्या, पलंग, सोफा, टॉयलेट, बाथरुम या सर्व गोष्टी उलट्या लावण्यात आल्या आहेत.
या घराच्या आत प्रवेश केल्यावर आपण उलटे चालतोय की घर उलटे आहे, असा प्रश्न सहज कोणालाही पडू शकेल अशीच याचे बांधकाम करण्यात आले आहे. विशेष म्हणजे पर्यटनाला चालना देण्यासाठी तैवानच्या पर्यटन विभागाने या घराच्या निर्मितीसाठी सहाय्य केले आहे. या घरात चक्क एक गाडीही उलटी लावण्यात आली आहे.
हे घर तयार करण्यासाठी साधारण दोन कोटी रुपयांचा खर्च आला आहे. सध्या इथे येणारे पर्यटक या घरात जास्तीत जास्त फोटो घेण्याचा आनंद लुटत आहेत.