स्वयंपाकघरातल्या 8 गोष्टी ब्लॅकहेडसच्या समस्येवर करतात उत्तम इलाज !
By Admin | Updated: May 10, 2017 16:54 IST2017-05-10T16:54:56+5:302017-05-10T16:54:56+5:30
ब्लॅकहेडसवर उपचार करणं अवघड वाटत असलं तरी त्यावरचे उपचार अगदीच सोपे आणि सहज आहे.स्वयंपाकघरातले आठ घटक ब्लॅक हेडसना कायमचं निकालात काढू शकतात.

स्वयंपाकघरातल्या 8 गोष्टी ब्लॅकहेडसच्या समस्येवर करतात उत्तम इलाज !
- मृण्मयी पगारे.
‘ब्लॅक हेडस’. सौंदर्यातला प्रमुख अडथळा. चेहेऱ्याच्या अगदी दर्शनी भागात हे येतात.कितीही लोशन आणि क्रीम्स लावा ते काही जाण्याचं नाव घेत नाही. मृत त्वचा आणि तेल यामुळे निर्माण होणारा छोटा काळा डाग म्हणजे ब्लॅक हेडस. हे ब्लॅक हेडस नाकाच्या भोवती तर कधी गालावर दिसतात. कधी पाठ, मान आणि हातावरही दिसतात. ब्लॅकहेडसवर उपचार करणं अवघड वाटत असलं तरी त्यावरचे उपचार अगदीच सोपे आणि सहज आहे. त्यासाठी कुठे दुकानात नाही तर आपल्या स्वयंपाकघरात जाण्याची गरज आहे. स्वयंपाकघरातले आठ घटक ब्लॅक हेडसना कायमचं निकालात काढू शकतात.
1.बेकिंग सोडा.
बेकिंग सोडा हा फक्त बेकच्या पदार्थांमध्ये वापरला जाणारा किंवा स्वच्छतेसाठी उपयुक्त घटक आहे असं नाही. सौंदर्य उपचारातही बेकिंग सोड्याला खूप महत्त्व आहे. अॅण्टिसेप्टिक गुणधर्मामुळे बेकिंग सोडा त्वचेसाठी फायदेशीर ठरतो. बेकिंग सोडा त्वचेसाठी वापरल्यास त्वचेवरच्या मृतपेशी निघून जातात. त्वचा मऊसूत होते. बेकिंग सोडयानं ब्लॅकहेडसही निघून जावू शकतात. त्वचेचा पी एच बेकिंग सोड्यानं वाढतो. त्यामुळे त्वचेवर अतिरिक्त तेल निर्माण होत नाही.आणि त्यामुळे ब्लॅकहेडसही निर्माण होत नाही.
यासाठी एका चिनी मातीच्या वाटीत एक चमचा बेकिंग सोडा घेवून त्यात थोडं पाणी मिसळावं. बेकिंग सोड्याची पेस्ट तयार होइल इतकं पाणी घालावं. ही पेस्ट त्वचेवर जिथे ब्लॅक हेडस आहे तिथे लावावी. दहा मीनिटं सुकू द्यावी आणि मग कोमट पाण्यानं लेप धुवून टाकावा. आठवड्यातून किमान दोनदा हा उपचार करावा.