'बिरा-९१' मध्ये सहा मिलियन डॉलर्सची गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 03:12 IST2016-01-16T01:06:18+5:302016-02-12T03:12:08+5:30

भारतीय बाजारपेठीतील प्रतिकूल वातावरण आणि जोखीमींसमोर हात न टेकवण्याचा अंकुर जैन यांचा निर्णय अखेर श...

$ 6 million investment in 'Bira-91' | 'बिरा-९१' मध्ये सहा मिलियन डॉलर्सची गुंतवणूक

'बिरा-९१' मध्ये सहा मिलियन डॉलर्सची गुंतवणूक

रतीय बाजारपेठीतील प्रतिकूल वातावरण आणि जोखीमींसमोर हात न टेकवण्याचा अंकुर जैन यांचा निर्णय अखेर शेवटी फळाला आला. त्यांच्या बी-९ बेव्हरेजेस कंपनीला 'बिरा-९१' बियरच्या उत्पादनासाठी सहा मिलियन डॉलर्स (३६ कोटी रु.) ची सीरीज ए फंडिंग मिळाली आहे.

एका मुलाखतीमध्ये अंकुरने म्हटले होते की, आरोग्यविषयक माहिती देण्याच्या माझ्या जॉबपेक्षा अल्कोहल क्षेत्रात अधिक चॅलेंज्स आणि मजा आहे. परंतु भारतामध्ये स्वयंउद्योग सुरू करणे अमेरिकेपेक्षा फार वेगळे आहे. तरीही व्यवसायाचा एक भाग म्हणून मी त्याकडे पाहतो. अंकुरला स्वत:ला 'चिमाय' बियर आवडते. फार कमी प्रमाणात ती बनवली जाते.

'बिरा-९१' ही प्रिमियम बियर असून तिला सेक्विओआ कॅपिटल, स्नॅपडीलचे रोहित बंसल व कुणाल बहल, क्रिस कॅपिटलचे आशिष धवन आणि झोमॅटोचे दीपेंदर गोयल यांच्याकडून गुंतवणूक मिळाली आहे.

Web Title: $ 6 million investment in 'Bira-91'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.