ट्विटरची ‘साउंडक्लाऊड’मध्ये 469 कोटींची गुंतवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2016 16:31 IST2016-06-15T11:01:59+5:302016-06-15T16:31:59+5:30
ट्विटरने आपल्या थांबलेल्या वृद्धीला चालना देण्यासाठी साउंडक्लाऊडमध्ये ७० मिलियन डॉलर्सची (सुमारे 469 कोटी रु.) गुंतवणूक केली आहे.

ट्विटरची ‘साउंडक्लाऊड’मध्ये 469 कोटींची गुंतवणूक
म यक्रो-ब्लॉगिंग वेबसाईट ट्विटरने आपल्या तीस कोटी यूजर्सना अधिक सुविधा पुरवून थांबलेल्या वृद्धीला चालना देण्यासाठी आॅनलाईन म्युझिक स्ट्रिमिंग सर्व्हिस साउंडक्लाऊडमध्ये ७० मिलियन डॉलर्सची (सुमारे 469 कोटी रु.) गुंतवणूक केली आहे.
अलिकडच्या काळात नवीन ग्राहकांना जोडण्यास ट्विटर अपयशी ठरले आहे. आपला यूजरबेस वाढविण्यासाठी नवीन यूजर्सना आकर्षित करण्याच्या हेतून कंपनीने हे पाऊल उचलले आहेत. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी ट्विटरने साउंडक्लाऊडला खेरदी करण्याचा प्रयत्न केला होता.
साउंडक्लाऊडच्या प्रवक्त्याने गुंतवणूक झाल्याची माहिती देताना म्हटले की, दोन्ही कंपन्या आजच्या टेक्नोकल्चरला सपोर्ट आणि वाव देण्यासाठी जगभरातील हॅपनिंग गोष्टी रिअल टाईममध्ये कोट्यवधी लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम करतात. या गुंतवणुकीमुळे यूजर्सना आणखी चांगल्या सुविधा देण्यासाठी आम्ही अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करू शकतो.
ट्विटरची दशकपूर्ती झाली असून कंपनी सध्या वाईट फेजमधून जात आहे. सोशल मीडियाच्या स्पर्धेमध्ये अपेक्षित परिणाम नोंदविण्यात कंपनी कमी पडत आहे. महिन्याकाठी सक्रीय ट्विटर यूजर्सच संख्येत झालेली घट कंपनीसाठी चिंतेची बाब आहे.
कंपनीचे सीईओ जॅक डोर्से यांनी अनेक नवीन धोरणं राबविण्यास सुरूवात केली असून त्याचाच एक भाग म्हणजे ही गुंतवणूक आहे.