​363 चौ. फूट घराची किंमत 3.6 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2016 22:11 IST2016-05-17T16:41:37+5:302016-05-17T22:11:37+5:30

सर्वात लहान घर 5.5 लाख डॉलर्समध्ये (सुमारे 3.6 कोटी रु.) विकले गेले.

363 square The price of a split house is 3.6 million | ​363 चौ. फूट घराची किंमत 3.6 कोटी

​363 चौ. फूट घराची किंमत 3.6 कोटी

ेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोमध्ये घर विकत घेणे आता सोपे राहिले नाही. जगप्रसिद्ध ‘गोेल्डन गेट’चे घर असलेल्या शहरात घराच्या किंमती आकाशाला भिडलेल्या आहेत. येथील सर्वात लहान घरसुद्धा सामान्य माणसाच्या खिशाला परवडण्यासारखे नाही.

नुकतेच शहरातील सर्वात लहान घर 5.5  लाख डॉलर्समध्ये (सुमारे 3.6 कोटी रु.) विकले गेले. केवळ 363 चौ. फूट क्षेत्रफळाचे हे फ्रीस्टँडिंग स्टुडिओ प्रकारातील घर शहरातील मिशन डिस्ट्रिक्ट भागात आहे. सुमारे 90 हजार रुपये प्रति चौ. फू ट अशा विक्रमी भावाने या घराची विक्री झाली.

तीन मजली इमारतीच्या मागे असलेले हे छोटेसे घर मुख्य रस्त्यावरून नजरेसही पडत नाही. एवढी गगनचुंबी किंमत मिळाल्यामुळे सॅन फ्रान्सिस्को रिअल इस्टेट क्षेत्रात याबाबत कमालीची चर्चा सुरू आहे.

विशेष म्हणजे डेट्राईट शहरात ज्या किंमतीमध्ये एखादा आलिशान बंगला विकतला जाऊ शकतो त्याच्यापेक्षा 60 लाख रुपयांनी महाग हे ईवलुसे घर आहे.

Web Title: 363 square The price of a split house is 3.6 million

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.