३६ टक्क्यांनी वाढले ‘दम के दीवाने’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2016 03:05 IST2016-02-28T10:05:18+5:302016-02-28T03:05:49+5:30

 मागच्या १८ वर्षांत सिगारेट ओढणाऱ्या पुरुषांची संख्या ३७ टक्क्यांनी वाढली आहे.

36 per cent rise in 'crazy heart' | ३६ टक्क्यांनी वाढले ‘दम के दीवाने’

३६ टक्क्यांनी वाढले ‘दम के दीवाने’

िगारेट स्वास्थ्यासाठी हानीकारक असते’ असा इशारा देऊनही धुम्रपान करण्यांची संख्या कमी झालेली नाही. उलटपक्षी मागच्या १८ वर्षांत सिगारेट ओढणाऱ्या पुरुषांची संख्या ३७ टक्क्यांनी वाढली आहे.

भारतीयवंशाच्या एका संशोधकाने केलेल्या सर्वेक्षणातून आलेल्या आकडीवारीनुसार १९९८ ते २०१५ या काळात सिगारेट पिणाºया परुषांची संख्या एक तृत्यांश वाढून 10.8 कोटी इतकी झाली आहे. सकारात्मक बातमी अशी की, तरुण महिलांमध्ये लक्षणीय वाढ झालेली नाही.

१५ ते ६९ वयोगटातील सिगारेट पिणाऱ्या पुरुषांची संख्या १९९८ मध्ये ७.९ कोटी इतकी होती. त्यामध्ये आणखी २.९ कोटी नव्या पुरुषांची भर पडून ती आता १०.८ इतकी झाली आहे. याचा अर्थ असा की, दरवर्षी १७ लाख पुरषांना सिगारेटचे व्यसन जडले.

विशेष म्हणजे १५ ते ६९ वयोगटातील पुरुषांमध्ये सिगारेट पिणाऱ्याचे सरासरी प्रमाण २७ टक्क्यांवरून घटून २०१० मध्ये २४ टक्क्यांपर्यंत घसरले. परंतु लोक संख्येत झालेल्या प्रचंड वाढीमुळे एकूण संख्या वाढली. बीएमजे ग्लोबल हेल्थ जर्नलमध्ये हे सर्वेक्षण प्रकाशित झाला आहे.

smoking

भारतामध्ये दरवर्षी मृत होणाºया एकूण लोकांपैकी १० टक्के लोकांना सिगारेटमुळे जीव गमवावा लागतो. जवळपास दहा लोक सिगारेटच्या व्यसनामुळे मरण पावतात. त्यांपैकी ७० टक्के लोकांचा तर ३० ते ६९ वायोमानात मृत्यू होतो.

Web Title: 36 per cent rise in 'crazy heart'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.