प्रोडक्टिव्ह कामासाठी 3 मिनिट रूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2016 14:53 IST2016-06-14T09:23:41+5:302016-06-14T14:53:41+5:30

तुमच्या आॅफिस कामाच्या प्रत्येक एक तासापैकी तीन मिनिट तुमच्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या नियोजनात नाहीत यासाठी राखून ठेवा.

3 minute rule for productive work | प्रोडक्टिव्ह कामासाठी 3 मिनिट रूल

प्रोडक्टिव्ह कामासाठी 3 मिनिट रूल

्रोडक्टिव्हिटी’ ही कॉर्पोरेट कल्चरमधील सर्वाधिक चर्चिला जाणारा विषय आहे. अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांकडून आॅफिस वेळेत अधिकाधिक ‘प्रोडक्टिव्ह’ कामं करून घेण्याकडे अधिक लक्ष देत आहेत.

कामाला सुरूवात करण्याआधी आजच्या कामाची यादी/नियोजन म्हणजेचे ‘टू-डू लिस्ट’ तयार करावी असे सांगितले जाते. पण कितीही तपशीलवार नियोजन केले तरी ते वेळेत पूर्ण होतीलच असे नाही.

ईमेल पाहा, फेसबुक चेक कर, व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज पाहा अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला कामात ‘खोडा’ घालतात. त्यामुळे मुख्य कामातून लक्ष विचलित होऊन नियोजन विस्कळित होते. मग असे  ‘डिस्ट्रॅक्शन’ टाळण्यासाठी एक छान सोपा उपाय म्हणजे - ‘3 मिनिट रूल’.

यानुसार, तुमच्या आॅफिस कामाच्या प्रत्येक एक तासापैकी तीन मिनिट तुमच्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या नियोजनात नाहीत यासाठी राखून ठेवा. म्हणजे याच तीन मिनिटातच ईमेल, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप चेक करा. यामुळे लक्ष विचलित होणार नाही आणि मुख्य कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करता येईल. 

या ‘तीन मिनिट रूल’चा फायदा असा की, प्रत्येक तासाला तुम्ही इतर गोष्टीकडे लक्ष देऊ शकता. म्हणजे काम करताना ज्या अडथळा आणणाºया गोष्टी असतात त्या तुमचा वेळ घेणार नाही. दिवसाअंती तुम्ही जास्तीत जास्त वेळ ‘प्रोडक्टिव्ह’ कामासाठी खर्च करून परफॉर्मन्स वाढेल.

Web Title: 3 minute rule for productive work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.