शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

Fact Check: गुजरातच्या नावानं व्हायरल होणारा बुलेट ट्रेनच्या यार्डचा 'तो' फोटो चीनमधला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 16:05 IST

निवडणुकीचा काळ असला की फेक न्यूज आणि खोट्या दाव्यांचं जणू पेव फुटतं.

निवडणुकीचा काळ असला की फेक न्यूज आणि खोट्या दाव्यांचं जणू पेव फुटतं. वेगवेगळ्या खोट्या दाव्यांसह फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केले जातात. सध्या गुजरात निवडणुकीच्या रणधुमाळीत असाच एक बुलेट ट्रेनच्या यार्डचा फोटो व्हायरल होत आहे. देशातील पहिला बुलेट ट्रेनचा प्रकल्प मुंबई-अहमदाबाद मार्गावर होणार आहे. याचं कामही सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर गुजरातमधील बुलेट ट्रेनच्या यार्डच्या नावानं एक फोटो व्हायरल केला जात आहे. ज्यात असंख्य बुलेट ट्रेन यार्डात उभ्या असल्याचं दिसतं. या फोटोची पडताळणी केली असता संबंधित फोटो गुजरातमधील नसून चीनच्या वुहान येथील असल्याचं आढळून आलं आहे. 

काय आहे दावा?"विश्वास बसणार नाही पण हा गुजरातचा फोटो आहे", अशा कॅप्शनसह असंख्य बुलेट ट्रेन यार्डमध्ये उभ्या असल्याचा फोटो फेसबुकवर व्हायरल झाला आहे. यात Viral In Maharashtra आणि Voice Of Maharashtra या फेसबुक पेजवर हा फोटो अपलोड करण्यात आला आहे. यासह इतरही काही ठिकाणी याच दाव्यासह हा फोटो व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. 

कशी केली पडताळणी?व्हायरल इमेजच रिव्हर्स इमेज टूलच्या सहाय्यानं सर्च केलं असता २८ ऑगस्ट २०१८ रोजी "Carl Zha" नावाच्या यूझरचं एक ट्विट आढळून आलं. ट्विटमध्ये हाच फोटो  "बुलेट ट्रेन्स, वुहान, चीन" मधील असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

याचाच आधार घेत यूट्यूबवर Bullet Trains in Whan असं सर्च केलं असता New China TV नावाच्या अकाऊंटवर दोन व्हिडिओ आढळून आले. Stunning aerial view of high-speed train maintenance center in Wuhan या मथळ्यानं अपलोड करण्यात आलेला व्हिडिओ पाहिला असता व्हायरल फोटोत दावा करण्यात आलेली जागा वुहानमधीलच असल्याचं दिसून येतं. 

New China TV च्या मते मध्य चीनमधील वुहान बुलेट ट्रेन देखभाल केंद्र हे सर्वात मोठं आहे. हे एकूण १.४ दशलक्ष चौरस मीटर क्षेत्रात पसरलेलं असून येथे एकाच वेळी १०० हून अधिक बुलेट ट्रेन उभ्या केल्या जाऊ शकतात. तसंच Getty Images या प्रतिष्ठित इमेज सोर्स पोर्टलवरही वुहान येथील बुलेट ट्रेन यार्डचे हे फोटो पाहता येतात. फोटो पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

याशिवाय, मुंबई-अहमदाबाद दरम्यानच्या भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाची सद्यस्थिती १६ ऑगस्ट २०२२ रोजी रेल्वे मंत्रालयानं शेअर केली होती. या संदर्भातील एक ट्विटही रेल्वे मंत्रालयानं केलं होतं. यात फोटोंमध्ये यार्डचा कोणताही फोटो आढळून आलेला नाही.

निष्कर्षः गुजरातमधील बुलेट ट्रेन यार्डच्या दाव्यानं व्हायरल करण्यात आलेला फोटो गुजरातचा नसून चीनमधील वुहान येथील आहे.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेन