शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

Fact Check : राहुल गांधी पुढचे पंतप्रधान होतील असा दावा करणारी शाहरुख खानची 'ती' पोस्ट खोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 11:44 IST

Fact Check : सोशल मीडियावर स्क्रीनशॉट शेअर करताना युजर्स दावा करत आहेत की, शाहरुख खानने राहुल गांधी देशाचे पुढचे पंतप्रधान होतील असं म्हटलं आहे. मात्र हा दावा दिशाभूल करणारा आहे.

Claim Review : शाहरुख खानने राहुल गांधी देशाचे पुढील पंतप्रधान होतील असं म्हटलं आहे.
Claimed By : Twitter User
Fact Check : चूक

Created By: BOOM Translated By: ऑनलाइन लोकमत

2024 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या हवाल्याने एका पोस्टचा स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. 'Next PM Rahul Gandhi Confirm' असं त्यावर लिहिण्यात आलं आहे. सोशल मीडियावर स्क्रीनशॉट शेअर करताना युजर्स दावा करत आहेत की, शाहरुख खाननेराहुल गांधी देशाचे पुढचे पंतप्रधान होतील असं म्हटलं आहे.

BOOM ला तपासात असं आढळून आलं की व्हायरल झालेला स्क्रीनशॉट पूर्णपणे खोटा आहे. शाहरुख खानने त्याच्या एक्स अकाउंटवरून अशी कोणतीही पोस्ट केलेली नाही.

एका एक्स युजरने "आता तर शाहरुख खाननेही राहुल गांधी पंतप्रधान होणार असल्याचं म्हटलं आहे" असं म्हटलं आहे.

(अर्काइव्ह पोस्ट)

फॅक्ट चेक 

BOOM ने शाहरुख खानचं एक्स हँडल चेक केलं तेव्हा त्यांना अशी कोणतीही पोस्ट मिळाली नाही, ज्यामध्ये त्याने राहुल गांधी पंतप्रधान होणार असल्याबद्दल म्हटलं आहे. शाहरुख खानची शेवटची पोस्ट 29 मे 2024 ची आहे ज्यामध्ये त्याने त्याच्या 'कोलकाता नाइट रायडर्स' संघाचे IPL 2024 जिंकल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

(अर्काइव्ह लिंक)

यानंतर आम्ही सोशल ब्लेड टूलवर शाहरुख खानचं एक्स अकाउंट तपासलं. त्यानुसार मे महिन्यात त्याने केवळ दोनच पोस्ट केल्या होत्या. सोशल ब्लेड हे सोशल मीडिया प्रोफाइल एनालिटिकल टूल आहे. त्याच्या मदतीने डिलीट केलेल्या पोस्टची माहितीही मिळू शकते.

शाहरुख खानच्या एक्स हँडलवरही मे महिन्यातील फक्त दोनच पोस्ट आढळतात. 18 मे 2024 रोजी केलेल्या दुसऱ्या पोस्टमध्ये (अर्काइव्ह लिंक) त्यांनी लोकांना मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन केलं होतं. याशिवाय दुसरी कोणतीही पोस्ट नाही. मुंबईत 20 मे रोजी लोकसभा निवडणूक 2024 साठी मतदान होत होतं, त्या पार्श्वभूमीवर शाहरुखने ही पोस्ट केली होती.

शाहरुखच्या X अकाऊंटमधून केलेल्या पोस्टशी सोशल ब्लेडच्या निकालांची जुळवाजुळव केल्यानंतर एकही पोस्ट डिलीट करण्यात आलेली नाही हे समोर आलं आहे. 

यानंतर आम्ही एक्स वर एडवान्स सर्चद्वारे तपास केला. आम्हाला पोस्टमध्ये असे कोणतेही रिप्लाय मिळाले नाहीत जे कोणत्याही डिलीट केलेल्या पोस्ट दाखवत आहेत. जसं की एक्सवर कोणतीही पोस्ट डिलीट केल्यानंतर त्या पोस्टवर केलेले रिप्लाय दाखवले जातात. 

या व्यतिरिक्त, आम्ही या दाव्यासंदर्भात मीडिया रिपोर्ट्स देखील शोधले परंतु आम्हाला अशी कोणतीही बातमी आढळली नाही. शाहरुख खानने जर कोणाला समर्थन केलं असतं तर ही मोठी बातमी झाली असती.

(सदर फॅक्ट चेक BOOM या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.) 

टॅग्स :Shahrukh Khanशाहरुख खानRahul Gandhiराहुल गांधी