शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

Fact check : खरंच मनसे प्रमुख-नरेंद्र मोदी शिवाजी पार्कवर एकाच मंचावर येणार? राज ठाकरेंनी दिले अपडेट्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 21:53 IST

Raj Thackeray : राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवाजी पार्कवर एकाच मंचावर येणार असल्याची माहिती समोर आली होती.

काल मनसे नेते अमित ठाकरे पुणे दौऱ्यावर होते. यावेळी अमित ठाकरे यांनी पत्रकारांसोबत अनौपचारिक संवाद साधत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे प्रमख राज ठाकरे एकाच मंचावर येणार असून शिवाजी पार्कवर सभा होणार आहे अशी माहिती दिल्याची बातमी समोर आली होती. याबाबत आता स्वत: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे.  मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आता ट्विट करुन स्पष्टीकरण दिले आहे. ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले की, "काल एका वृत्तवाहिनीवर, अमितशी झालेल्या अनौपचारिक गप्पांचा दाखला देत, ‘राज ठाकरे आणि पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी हे लोकसभा निवडणुकींच्या दरम्यान एका व्यासपीठावर दिसणार अशी बातमी चालवली. मुळात अमितने असं कोणतंही विधान केलेलं नाही, असं राज ठाकरे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

"अमित काल पुण्याच्या दौऱ्यावर होता आणि तिथे पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. त्यावेळेस अमितने वरील विधान केल्याचा दावा एकाच वृत्तवाहिनीच्या पत्रकारांनी केला. इतर कुठल्याच पत्रकाराने ही बातमी का नाही केली? तिथे इतरही अनेक पत्रकार होते पण कोणीच ही बातमी केली नाही, याचं कारण अमितने असं विधान केलंच नाही, असंही ठाकरेंनी म्हटलं आहे.

"अनौपचारिक गप्पा या अनौपचारिकच ठेवायच्या असतात आणि त्यात न केलेली विधानं तोंडात कोंबायची नसतात हा संकेत असतो. असो. सर्व माध्यमांनी या बातमीकडे साफ दुर्लक्ष करावं, अशी विनंतीही राज ठाकरे यांनी केली आहे.

बातमी काय होती?

काल मनसे नेते अमित ठाकरे पुणे दौऱ्यावर होते. यावेळी पत्रकारांसोबत अनौपचारिक संवाद साधताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकाच मंचावर येणार असल्याची माहिती दिल्याची बातमी समोर आली होती.

राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यावेळी कार्यकर्त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी कार्यकर्त्यांना आवाहन केले होते. त्यावेळी लवकरच प्रचारसभा घेणार असल्याचे सांगितले होते. यामुळे अमित ठाकरे यांनीही याबाबत माहिती दिल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या होत्या.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेNarendra Modiनरेंद्र मोदीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४