Fact Check: राणीच्या बागेचं नाव आता ‘हजरत हाजी पीर बाबा राणी बाग’; व्हायरल फोटोमागचं सत्य काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 09:03 AM2021-12-22T09:03:04+5:302021-12-22T09:20:24+5:30

मुंबईच्या राणी बागेचं नाव आता हजरत अली पीर बाबा राणी बाग असं काळ्या ग्रॅनाईटबोर्डावर कोरलेल्या नावाचा फोटो व्हायरल होत आहे. फेसबुकवर हा दावा करण्यात येत आहे.

Fact Check: The name of Rani Baug is now 'Hazrat Haji Peer Baba is Social media post are Fake | Fact Check: राणीच्या बागेचं नाव आता ‘हजरत हाजी पीर बाबा राणी बाग’; व्हायरल फोटोमागचं सत्य काय?

Fact Check: राणीच्या बागेचं नाव आता ‘हजरत हाजी पीर बाबा राणी बाग’; व्हायरल फोटोमागचं सत्य काय?

googlenewsNext

मुंबई – गेल्या अनेक वर्षापासून मुंबईकरांसाठी वीरमाता जिजाबाई भोसले व उद्यान प्राणीसंग्रहालय हे आकर्षणाचं केंद्र ठरलं आहे. सुट्टीच्या दिवशी सर्वसामान्य मुंबईकर आपल्या मुलाबाळांना घेऊन याठिकाणी फिरण्यास येत असतो. या प्राणीसंग्रहालयात वन्यप्राण्यांसह आता परदेशी पाहुणेही पाहायला मिळतात. पेग्विंन दर्शन ही या बागेचं वैशिष्टं आहे. राणीची बाग या नावानं वीरमाता जिजाबाई भोसले व उद्यान प्राणीसंग्रहालयाची ओळख आहे. मात्र सोशल मीडियावर फिरणाऱ्या एका फोटोमुळे सगळ्यांमध्ये संताप पसरत आहे.

नेमका व्हायरल होणाऱ्या या फोटोत हजरत अली पीर बाबा राणी बाग असं लिहिण्यात आलेली एक पाटी दिसत आहे. हा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. अनेक जण या फोटोला फॉरवर्ड करत महाराष्ट्रात नक्की काय चाललंय? वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान नाव गायब झालं का? ही आता नुसती राणीची बाग नाही तर हजरत हाजी पीर बाबा राणीची बाग असं म्हणायचं अशा आशयाचे कॅप्शन देऊन व्हायरल केले जात आहेत. तुम्हीही हा व्हायरल फोटो इतरांना फॉरवर्ड करण्यापूर्वी जरा थांबा, आणि त्याची सत्यता वाचा

काय आहे फोटोमागचं सत्य?

मुंबईच्या राणी बागेचं नाव आता हजरत अली पीर बाबा राणी बाग असं काळ्या ग्रॅनाईटबोर्डावर कोरलेल्या नावाचा फोटो व्हायरल होत आहे. फेसबुकवर हा दावा करण्यात येत आहे. त्याबद्दल पडताळणी केली असता हे उद्यान १८६१ साली व्हिक्टोरिया गार्डन(Victoria Garden) नावानं सुरु करण्यात आले होते. तेव्हा शहरातील मराठी लोकं त्याला राणीची बाग म्हणून म्हणत असे. स्वातंत्र्यानंतर या बागेचे नामांतरण वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान असं करण्यात आले.

व्हायरल होणाऱ्या दाव्याप्रमाणे राणीच्या बागेचं नाव हजरत अली पीर बाबा राणी बाग असं करण्यात आले. परंतु या उद्यानात प्रवेश करताना मोठ्या ठळक अक्षरात वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय असं लिहिण्यात आलेले आहे. या प्राणी संग्रहालयात येणाऱ्या पर्यटकांना देण्यात येणाऱ्या तिकिटांवरही बृहन्मुंबई महानगरपालिका वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय छापण्यात आल्याचं दिसून येते. हे उद्यान मुंबई महापालिकेच्या अख्यारित येत असल्याने या दाव्याबाबत मुंबईच्या महापौरांनी स्पष्टीकरण दिले आहे.

महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, उद्यानाचे नाव बदलण्यात आल्याचे दावे खोटे असून या उद्यानात हजरत अली पीर बाबा यांचा दर्गा आधीपासून आहे. या दर्ग्यात हिंदु-मुस्लीम दोघंही ऐक्य भावनेने माथा टेकतात. ऐक्याचं प्रतिक म्हणून याकडे पाहिले जाते. काही समाजकंटक अशाप्रकारे फोटो व्हायरल करुन विनाकारण समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायेत. या उद्यानाचे नाव वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय आहे आणि भविष्यात राहील. हे नाव बदलण्याची कुणाची हिंमत नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिले.

Read in English

Web Title: Fact Check: The name of Rani Baug is now 'Hazrat Haji Peer Baba is Social media post are Fake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.