शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

Fact Check: बाबर आझमची प्रेक्षकांकडून खिल्ली, व्हिडिओ होतोय व्हायरल; पण आला मोठा ट्विस्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 12:29 IST

Fact Check: फिल्डिंग करत असताना प्रेक्षक बाबर आझमची खिल्ली उडवतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. परंतु, फॅक्ट चेक केल्यावर त्यातून वेगळीच बाब आढळून आली आहे.

Claim Review : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तानच्या झालेल्या सामन्यात चाहते बाबर आझमला ट्रोल करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल.
Claimed By : Social Media
Fact Check : चूक

Created By: BOOMTranslated By: ऑनलाइन लोकमत

Fact Check: अलीकडेच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला. दुबईत झालेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तावर सहज विजय मिळवला. चॅम्पियन्स ट्रॉफी अंतर्गत दुबईमध्ये नुकत्याच झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार बाबर आझमचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये प्रेक्षक मागून बाबर आझमला ट्रोल करताना दिसत आहेत.

व्हायरल झालेल्या व्हिडिओसोबतच सोशल मीडिया युझर्सकडून असा दावा केला जात आहे की, बाबर आझमला ट्रोल करण्याची ही घटना नुकत्याच झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान घडली, ज्यामध्ये भारताने पाकिस्तानला सहा गडी राखून पराभूत केले. या व्हिडिओसंदर्भात फॅक्ट चेक केले असता, हे प्रकरण जुने असल्याचे आढळून आले. याचा भारत-पाकिस्तान सामन्याशी काहीही संबंध नाही. हा व्हिडिओ १६ नोव्हेंबर २०२४चा आहे. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया टी-२० सामन्यादरम्यान बाबर आझमला प्रेक्षकांनी ट्रोल केले होते.

व्हायरल व्हिडिओमध्ये, काही प्रेक्षक सामन्यादरम्यान बाबर आझमला ट्रोल करत असून, त्याला टी-२० मध्ये स्थान नाही, असे सांगत फिरकी घेतल असल्याचे पाहायला मिळत आहे. इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करताना एका युझरने लिहिले आहे की, पाकिस्तानी चाहते बाबर आझमचा खूप अपमान करत होते... #INDvsPAK.

पोस्टची अर्काइव्ह लिंक

फॅक्ट चेक करताना काय आढळून आले?

व्हायरल झालेल्या व्हिडिओची पडताळणी करण्यासाठी व्हिडिओच्या मुख्य फ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च करण्यात आला. याद्वारे, १७ नोव्हेंबर २०२४ रोजी इंस्टाग्रामवर पोस्ट केलेला तोच व्हिडिओ सापडला, ज्यावरून स्पष्ट झाले की, हा नुकत्याच झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ अंतर्गत झालेल्या सामन्याचा व्हिडिओ नाही. जेव्हा व्हायरल व्हिडिओ बारकाईने पाहिला तेव्हा आम्हाला असेही आढळले की, स्टेडियमच्या आतील डिस्प्ले बोर्डवर 'सिडनी क्रिकेट ग्राउंड' लिहिलेले होते, जे ऑस्ट्रेलियामध्ये आहे. याशिवाय, असेही आढळले की, व्हायरल व्हिडिओमध्ये बाबर आझमने घातलेली जर्सी सध्या सुरू असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानच्या अधिकृत जर्सीपेक्षा वेगळी आहे.

या मिळालेल्या माहितीनंतर, संबंधित कीवर्ड वापरून बातम्यांचे रिपोर्ट्स पडताळून पाहिले. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील टी-२० सामन्यादरम्यान बाबर आझमच्या या ट्रोलिंगबद्दल आम्हाला असे अनेक रिपोर्ट्स सापडले. टाइम्स ऑफ इंडियाच्या १७ नोव्हेंबर २०२४ रोजीच्या एका रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, या सामन्यात बाबर आझमला बरीच टीका सहन करावी लागली. या वृत्तानुसार, पहिल्या डावात पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम बाऊंड्रीवर फिल्डिंग करायला उभा असताना प्रेक्षकांच्या एका ग्रुपने त्याला ट्रोल करायला सुरुवात केली. ओरडून सांगायला लागले की, "थोडी लाज बाळगा! टी-२० मध्ये तुम्हाला जागा नाही - परत जा."

दरम्यान, पाकिस्तानी एआरवाय न्यूजनेही या व्हिडिओचे वृत्त दिले आहे. यात क्रिकेटपटू इमाम-उल-हक यांचे विधान समाविष्ट आहे. इमाम-उल-हकने त्यांच्या वक्तव्यात बाबर आझमला पाठिंबा दिला होता. "एक राष्ट्र म्हणून आपण अपयशी ठरलो आहोत. पाठिंबा देण्याऐवजी आपण त्यांची थट्टा करतो. बाबर, तू अजूनही चॅम्पियन आहेस", असे त्याचे म्हणणे रिपोर्ट्सच्या हवाल्याने देण्यात आले आहे. 

(सदर फॅक्ट चेक BOOM या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाBabar Azamबाबर आजमChampions Trophyचॅम्पियन्स ट्रॉफी २०२५India vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तान