शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
3
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
4
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणूकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
5
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
6
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
7
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
8
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
9
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
10
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
11
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
12
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
13
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
14
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
15
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
16
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
17
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
18
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
19
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
20
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार

World Environment Day : जंगलाचे प्रमाण कमी असल्याने पर्यावरणाचा घात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 10:48 IST

पर्यावरणातील विविध घटकांचा दिवसेंदिवस ºहास होत असल्याने त्याचा परिणाम निसर्गचक्रातील विविध घटकांवर होत आहे.

- सदानंद सिरसाट  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: पर्यावरणातील विविध घटकांचा दिवसेंदिवस ºहास होत असल्याने त्याचा परिणाम निसर्गचक्रातील विविध घटकांवर होत आहे. सतत वाढणारे तापमान, पावसाच्या प्रमाणात होणारी घट, सातत्याने येणारी नैसर्गिक आपत्ती हा त्याचाच परिणाम असल्याने किमान आता तरी पर्यावरणातील घटकांचे जतन करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी जंगल, जीवभूरसायन चक्राचे संवर्धन करण्यासाठी प्रत्येकाने पुढे येण्याची जाणीव जागृती निर्माण करणे, त्यासाठीचा प्रयत्न जागतिक पर्यावरण दिनापासून सुरू व्हायला हवा.नागरिकांनी असेच सुस्त राहून पर्यावरणाच्या होणाऱ्या ºहासाकडे दुर्लक्ष केल्यास सजीवसृष्टीसह मानवी अस्तित्व धोक्यात यायला वेळ लागणार नाही. त्याचे काही पडसाद आताच उमटत आहेत. गत दहा वर्षांत जिल्ह्याच्या तापमान, पाऊसमानात झालेला बदल पाहता पर्यावरणात झपाट्याने झालेले बदल दिसून येतात.जिल्ह्यात जंगलाचे प्रमाण पाहता ते नगण्य आहे. जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र पाहता ५६७३ चौ. किमी आहे.पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक जिल्हा, राज्य, देशात किमान ३३ टक्के जंगल असणे अनिवार्य आहे. अकोला जिल्ह्यात केवळ ३४०.३७ चौ. किमी क्षेत्रावर जंगल आहे. त्याची टक्केवारी केवळ ६ आहे. त्यातही घनदाट जंगल केवळ ११ चौ. किमी क्षेत्रातच आहे. मध्यम स्वरूपाचे १०८, खुले जंगल २२० चौ. किमी क्षेत्रात आहे. वाढती लोकसंख्या, हवा, पाणी, ध्वनीचे वाढलेले प्रदूषण पाहता हे प्रमाण किती व्यस्त आहे, याचा विचारही शासन, प्रशासन, सामान्य नागरिकांनी अद्यापही न केल्याने पर्यावरणाचा होत असलेल्या घात नजीकच्या काळात विध्वंसक ठरणारा आहे.

शहरात हरितपट्ट्यांची निर्मितीअकोला शहरातील प्रदूषण पाहता मोठ्या प्रमाणात वृक्षांची गरज आहे. हवेतील कार्बन, सल्फर डायआॅक्साइडचे वाढते प्रमाण त्या तुलनेत आॅक्सिजनचे कमी होत जाणारे प्रमाण चिंताजनक ठरणार आहे. त्यासाठी शहरात हरितपट्ट्यांची निर्मिती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. असाच एक प्रयत्न जुने शहरातील हरिहरपेठ परिसरात झाला आहे. चार एकर क्षेत्रावर विस्तारलेल्या जंगलात मोठ्या प्रमाणात वृक्षांचे संवर्धन झाले आहे. त्यातून नागरिकांसाठी प्राणवायूची निर्मिती होत आहे.वने, वन्यजीवांचे संवर्धनही आवश्यकपर्यावरणाची साखळी टिकवून ठेवण्यासाठी वने आणि वन्यजीवांचे संवर्धन करणेही तेवढेच आवश्यक आहे. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा अभयारण्यात वन्य जीवांची काळजी घेण्यासाठी पाणवठ्यांची निर्मिती करण्यात आली. तसेच अवैध चराई, जंगलातील घुसखोरी, लगतच्या बाजूंनी होणारे अतिक्रमण थांबवण्यात आले आहे. परिणामी, या अभयारण्यात प्राणी, वनस्पती, कुरणाचे प्रमाण बºयापैकी वाढले आहे.पर्यावरणातील अन्नसाखळी व इतरही घटकांचे संवर्धन न झाल्यास नैसर्गिक आपत्तीचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ते धोके टाळण्यासाठी मानवाने पर्यावरण अर्थात निसर्गातील घटकांचे संवर्धन करण्याला युद्धपातळीवर प्रयत्न करणे, ही काळाची गरज आहे.- मनोजकुमार खैरनार, विभागीय वनाधिकारी, वन्यजीव, अकोला.

 

 

टॅग्स :Akolaअकोलाenvironmentपर्यावरणWorld Environment DayWorld Environment Day