शहरं
Join us  
Trending Stories
1
आंबटशौकिन अडचणीत...! केंद्राची उल्लू, ALTT सारख्या सॉफ्ट पॉर्न अ‍ॅपवर बंदी, पहा पूर्ण लिस्ट...
2
Mumbai Rain Alert: 'काम नसेल तर घरीच थांबा!' मुंबईत पावसाचा धुमाकूळ, लोकल रेल्वे सेवेला फटका
3
Crime News : इन्स्टाग्रामवरील कमेंटमुळे जीवाला मुकला! आधी छोले-भटुरे खायला दिले, नंतर २७ वेळा चाकूने वार केले
4
महाराष्ट्रातील नोकऱ्यांसाठी यूपी-बिहारच्या विद्यार्थ्यांची जोरात तयारी, शिकतायेत मराठी
5
Bajaj Finance Share: नफा वाढला, तरी बजाज फायनान्सचा शेअर आपटला; ब्रोकरेजनं का बदललं रेटिंग?
6
PM मोदी यांनी इंदिरा गांधींनाही टाकलं मागे, ठरले सर्वाधिक काळ पंतप्रधान राहणारे दुसरे व्यक्ती; त्यांचे हे महाविक्रम जाणून तुम्हीही थक्क व्हाल
7
आधी भारताविरोधात गरळ ओकली; आता PM मोदींच्या स्वागतासाठी मंत्रिमंडळासह मुइझ्झू हजर
8
Mumbai: भाडेकरूने घरमालकालाच कार खाली चिरडण्याचा केला प्रयत्न, मुंबईतील घटना
9
'तो' अखेरचा व्हिडिओ कॉल, त्यानंतर मृत्यूची बातमी आली; महिला इंजिनिअरचा संशयास्पद मृत्यू
10
श्रावण शनिवार: प्रल्हादासाठी घेतलेल्या अवताराचे स्मरण, ‘असे’ करा नृसिंह पूजन; पाहा, मान्यता
11
बिहारनंतर आता संपूर्ण देशात मतदार याद्यांची तपासणी होणार; SIR बाबत आदेश निघाले...
12
अनिल अंबानींच्या कंपन्यांचे शेअर्स विकण्यासाठी रांगा; सर्वांनाच लागलं लोअर सर्किट, गुंतवणूकदारांत भीती
13
"मी आज पुण्याचा खासदार असतो, काँग्रेसचं तिकिट मला फायनल झालं होते, पण..."; वसंत मोरेंचा दावा
14
पहिला श्रावण शुक्रवार: वसुमान योगात 'या' राशींवर होणार लक्ष्मीकृपेची बरसात!
15
महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा करेक्ट कार्यक्रम; लाडकी बहीण योजनेतील पडताळणीला स्थगिती?
16
मनसेशी युती करण्याचा शिंदेसेनेचा आग्रह; राज ठाकरेंच्या टाळीसाठी एवढा आटापिटा कशासाठी? चर्चांना उधाण
17
मुस्लीम धर्मगुरुंसोबत RSS प्रमुख मोहन भागवतांनी केली चर्चा; ३ तासांच्या बैठकीत काय ठरले?
18
Raju Shetti :'५०० एकराची कागदपत्रे त्यांनी द्यावीत, २५ तारखेपर्यंत आरोप सिद्ध करावा'; राजू शेट्टींचे एकनाथ शिंदेंच्या आमदाराला ओपन चॅलेंज
19
'सैयारा' चित्रपट पाहिला अन् एका गर्लफ्रेंडसाठी दोन तरुण भिडले; तुंबळ हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल
20
ऑगस्टमध्ये बँका 'इतके' दिवस बंद राहणार! महत्त्वाचे काम असेल तर लगेच करा, अन्यथा अडचण होईल!

World Environment Day :  घटते वृक्षाच्छादन बनली समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 10:47 IST

वड, पिंपळांच्या दाट गर्द झाडीत लपलेले बुलडाणा शहर आज सिमेंट काँक्रीटचे जंगल बनू पाहत आहे.

- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : विकासाच्या वाटेवर धावतांना शाश्वत विकासाला प्राधान्य न दिल्याने वृक्षतोड वाढून वनाच्छादीत प्रदेश जिल्ह्यात कमी असून त्याचे आता प्रत्यक्ष दृष्यपरिणाम समोर येत आहे. कडूलिंबाच्या आणि वड, पिंपळांच्या दाट गर्द झाडीत लपलेले बुलडाणा शहर आज सिमेंट काँक्रीटचे जंगल बनू पाहत आहे.९० च्या दशकात प्रत्येक घरासमोर असलेले मेहंदीचे कुंपन, सर्वत्र दिसणारी हिरवळ आज नसल्यागत आहे. जिल्ह्यातील महत्त्वाच्या शहरांचीही अशीच स्थिती आहे. ग्लोबल वार्मिंकचे परिणाम आता स्थानिक पातळीवरही दिसून येत आहे. १९८५ दरम्यान, किरकोळ स्वरुपात होणारी गारपीट आज तीव्र स्वरुपात झाली आहे. मार्च महिन्यात कधी बुलडाणा जिल्ह्याने रेनी डे पाहिला नव्हता. मात्र आता मार्च एप्रिलमध्ये पाऊस पडत असल्याचे सर्रास चित्र दिसते. अवकाळी पाऊस ही अधिक होत असून तो मोठे नुकसान करणारा ठरत आहे.पावसाळ््यात पडणारा पाऊस हा एकदमच पडत असून अपघाव पद्धतीने पडणारा हा पाऊस शेत जमीनीचीही मोठी हानी करत आहे. प्रामुख्याने बुलडाणा जिल्ह्यात २००३ पासून एक वर्ष सरासरी पाऊस तर पुढील तीन वर्षे सरासरीपेक्षा कमी पाऊस असे चित्र दिसत आहे. त्यातून दुष्काळाची तीव्रता, पाणीटंचाई व नागरी समस्या उद्भवत आहे. नदी नाल्यांमध्ये शहरी भागात अतिक्रमण झाल्याने आपत्तीची व्याप्तीही वाढत आहे. आॅक्टोबर, डिसेंबर पर्यंत पूर्वी वाहनाऱ्या नद्या आता तर अगदी आॅक्टोबरमध्येच आटत आहे.जिल्ह्यातील शेत जमिनीमध्येही पेस्टीसाईडचे प्रमाण वाढले असून २४ गावात ते आढळून आले आहे. पूर्वी जवळपास ७२ दिवस पडणारा पाऊस आताशा अवघ्या ४२ दिवसांवर आला आहे. त्यातही तो ओढ देत असल्याने पीक पद्धतीतही आता काही प्रमाणात बदल होत आहेत.

बुलडाणा शहराचे वैभव असलेल्या राजूर घाटातील वनसंपदा वृक्षतोडीने विरळ झाली. विकासाच्या नावाखाली शाश्वत विकासाला आपण दूर सारत आहोत. त्यामुळे बुलडाणा हे थंड हवेचे वाळवंट होण्याची भीती आहे.-प्रा. अलोक शेवडेजैवविविधता समिती सदस्य, बुलडाणा

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाenvironmentपर्यावरणforestजंगलWorld Environment DayWorld Environment Day