शहरं
Join us  
Trending Stories
1
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
2
'उपमुख्यमंत्र्यांनी तुमच्याकडून मदत घेण्याचे सांगितले' अकोल्याच्या माजी आमदारांना बदमाशांकडून फसवण्याचा प्रयत्न
3
IND vs PAK: पाकिस्तानचं 'संडे' रूटीन- भारताविरूद्ध खेळा, हरा आणि घरी जा! सलग ४ रविवार पराभव
4
अपघात प्रकरणात गौतमी पाटीलला 'क्लीन चीट', पोलिसांनी सांगितले, 'गुन्हा दाखल होऊ शकत नाही'
5
गिफ्ट मिळालेली 'HAVAL H9' कार अभिषेक शर्मा भारतात चालवू शकणार नाही; कारण ऐकून व्हाल हैराण
6
शिंदेसेना-भाजपा नेत्यांमध्ये कुरघोडी सुरूच; स्थानिक निवडणुकांपूर्वीच महायुतीत उडू लागले खटके
7
शाहरुख खानच्या मागे उभी असलेली ज्युनिअर आर्टिस्ट, आज आहे प्रसिद्ध अभिनेत्याची बायको
8
हृदयद्रावक! छोट्या भावाच्या मृत्यूचा धक्का, दादाला आला हार्ट अटॅक; प्रेग्नंट वहिनी कोसळली अन्...
9
Video: डोकं फोडलं, रक्तबंबाळ केलं..; भाजपच्या आमदार-खासदारवर जमावाचा जीवघेणा हल्ला
10
वकिलाने वस्तू भिरकावल्यावर सरन्यायाधीश भूषण गवई यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “तुम्ही...”
11
NPS आता म्युच्युअल फंडासारखं काम करणार! पैसे काढण्याचे नियम बदलले; १००% इक्विटीचा पर्याय
12
बिहारमध्ये कितपत खरे ठरले होते ओपिनियन पोल? आताच्या सर्व्हेत कुणाचं सरकार? 'इंटरेस्टिंग' आहेत आकडे!
13
'तू इथेच थांब, मी आलेच...'; सख्ख्या भावाच्या हातावर तुरी देऊन बहिणीच्याच नवऱ्यासोबत पळून गेली तरुणी!
14
“‘आय लव्ह मोहम्मद’ यात काही वाईट-चुकीचे नाही”; धीरेंद्र शास्त्रींना नेमके म्हणायचे तरी काय?
15
'सैयारा' फेम अहान पांडेच्या आगामी सिनेमाची चर्चा, 'ही' मराठी अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार?
16
सोनम वांगचुकच्या अटकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला नोटीस बजावली; पत्नी गीतांजली यांनी केल्या दोन मागण्या
17
आता परतीचे दोर नाही, युतीची चर्चा फार पुढे गेलीय; मनसेसोबतच्या युतीवर संजय राऊत असं का म्हणाले?
18
Manas Polymers Listing: १५३ रुपयांवर लिस्ट झाला हा स्वस्त IPO; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना ९०%चा फायदा, झाले मालामाल
19
राम मंदिरावर लक्ष्मी प्रसन्न! १५३ कोटी दान, १७३ कोटी बँक व्याज; कमाई आकडे पाहून व्हाल अवाक्
20
३ महिने भरपूर पैसा, ४ राशींचे आयुष्यच बदलेल; कल्पनेपलीकडे यश-लाभ, बाबा वेंगांचे मोठे भाकित!

आपल्या अवतीभवतीच्या पाणथळ परिसंस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 10:46 IST

नांदूरमधमेश्वर, लोणार, उजनी, धामापूर आदी पाणथळी आपल्यापैकी काहींना ऐकून माहीत असतील; तर काहींनी अशा पाणथळींना भेटीही दिल्या असतील.

- रेश्मा जठारपर्यावरण संशोधक

महाराष्ट्रात अडीच हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रफळावर पसरलेल्या म्हणजे मोठ्या पाणथळी २३ हजारांहून अधिक आहेत. त्यातील किमान १३ पाणथळी नवी मुंबईसारख्या दाट लोकवस्तीच्या शहरात आहेत, असे सरकारने उच्च न्यायालयात सांगितले होते. 

नांदूरमधमेश्वर, लोणार, उजनी, धामापूर आदी पाणथळी आपल्यापैकी काहींना ऐकून माहीत असतील; तर काहींनी अशा पाणथळींना भेटीही दिल्या असतील. पाणथळ ही आपल्या अवतीभवती सहज आढळणारी परिसंस्था आहे. भारतात नैसर्गिक पाणथळी या हिमालय, गंगा-ब्रह्मपुत्रा नद्यांची गाळाची मैदाने व त्रिभुज प्रदेश आणि किनारपट्टीच्या प्रदेशात आहेत.

बांधबंधारे, धरणे-जलवाहिन्या बांधल्यामुळे, रस्ते-लोहमार्ग बांधण्यासाठी घातलेल्या भरावामुळे पाणी अडल्यामुळे, मिठागरे, तळी-तलाव, मत्स्यपालनाकरिता टाक्या बांधल्यामुळे मानवनिर्मित पाणथळी तयार झाल्या आहेत. उथळ पाणीसाठा, त्या साठ्यात पाणी शिरण्यासाठी आणि त्यातून पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग, या मार्गांनी ठराविक नियमितपणे होणारी पाण्याची ये-जा व त्यामुळे पाण्याच्या स्तरात होणारे बदल या घटकांवर पाणथळीचे चलनवलन अवलंबून असते. 

पाणीसाठा उथळ असल्यामुळे पाण्याच्या तळापर्यंत सूर्यप्रकाश पोहोचू शकतो, पाण्यात ऑक्सिजन मोठ्या प्रमाणावर मिसळला जातो. प्रकाश संश्लेषणाद्वारे अन्ननिर्मिती करण्यासाठी वनस्पतींना हे दोन मुख्य घटक पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्यामुळे पाणथळींमध्ये मोठ्या प्रमाणावर अन्नोत्पादन होते. त्यावर अवलंबून गुंतागुंतीच्या अन्नसाखळ्या निर्माण होतात. मोठ्या संख्येने विविध वनस्पती, पशुपक्षी इथे जगू शकतात. याउलट, खोल समुद्र आणि प्रचंड मोठ्या धरणांच्या खोल जलाशयांमध्ये जीवांचे फारसे वैविध्य व संख्याही नसते. पाणथळ असलेल्या परिसरात भूजल स्तर चांगला राहतो. पुराच्या वेळी पाण्याचा लोंढा प्रथम पाणथळीत शिरतो. त्यामुळे पुराचा जोर ओसरतो आणि जीवित व वित्तहानीवर नियंत्रण येते. महाराष्ट्रात अडीच हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रफळावर पसरलेल्या म्हणजे मोठ्या पाणथळी २३ हजारांहून अधिक आहेत. त्यातील किमान १३ पाणथळी नवी मुंबईसारख्या दाट लोकवस्तीच्या शहरात आहेत. राज्य शासनाने २०२२ मध्ये, मुंबई उच्च न्यायालयात एका सुनावणीदरम्यान प्रतिज्ञापत्राद्वारे ही माहिती दिली. याखेरीज, हजारोंच्या संख्येने लहान पाणथळीही आहेत.स्वातंत्र्यपूर्व काळात परिस्थिती वेगळी होती. पर्यावरणतज्ज्ञ आणि पक्षी निरीक्षक प्रा. प्रकाश गोळे यांनी केलेली एक नोंद पाहा; ते लिहितात, ‘‘एके काळी महाराष्ट्रात फारशा पाणथळी नसाव्यात. स्थलांतर करून भारतात येणारी विविध प्रकारची बदके महाराष्ट्र ओलांडून कर्नाटकात जात. कारण तिथे सिंचन योजनांमार्फत बांधलेले अनेक पाणीसाठे होते. बार-हेडेड गूस हा पक्षी स्वातंत्र्यपूर्व काळात महाराष्ट्रात क्वचितच दिसत असे, नंतरच्या काळात मात्र तो हिवाळ्यात मोठ्या संख्येने महाराष्ट्रात आढळू लागला.’’ मात्र, पाणथळींची संख्या वाढली म्हणजे निसर्ग संवर्धन झाले असे नव्हे; यातील बहुसंख्य पाणथळी दुर्लक्षित आहेत. त्यामध्ये प्लास्टिकसह इतर घनकचरा टाकणे, कारखान्यांतील दूषित पाणी, मानवी वसाहतीतील सांडपाणी सोडणे, शेतांमधून वाहून आलेली रसायने पाणथळीतील पाण्यात मिसळणे, या नित्याच्या बाबी आहेत. पाणथळींसह इतर जलीय परिसंस्था या मानवनिर्मित कचरा रिचवण्यासाठीच असल्याचा आपला समज आहे. हा कचरा रिचवला जातो की केवळ दृष्टीआड जातो, याविषयी पुढच्या खेपेस. 

English
हिंदी सारांश
Web Title : Wetland Ecosystems Around Us: Importance and Threats Explored

Web Summary : Maharashtra has numerous wetlands, vital for biodiversity and flood control. Many are human-made, yet face pollution from waste, sewage, and agricultural runoff, harming these crucial ecosystems. Conservation is critical.
टॅग्स :environmentपर्यावरण