शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

खाद्य न मिळाल्याने शेकरु मानवी वस्तीकडे, भादवणमध्ये आढळला राज्यपक्षी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 18:40 IST

भादवण ( ता. आजरा ) येथे दुर्मिळ असणारा व महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी असलेला (उडती खार) शेकरू आढळून आला आहे. दिवसभर खाद्य न मिळाल्याने तो अशक्त झाला होता. सायंकाळी पुन्हा मराठी शाळेजवळील नारळाच्या झाडाच्या टोकावर बसलेला नागरिकांनी त्याला पाहिले.

ठळक मुद्देखाद्य न मिळाल्याने शेकरु मानवी वस्तीकडेभादवणमध्ये आढळला राज्यपक्षी

सदाशिव मोरेआजरा  :  भादवण ( ता. आजरा ) येथे दुर्मिळ असणारा व महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी असलेला (उडती खार) शेकरू आढळून आला आहे. दिवसभर खाद्य न मिळाल्याने तो अशक्त झाला होता. सायंकाळी पुन्हा मराठी शाळेजवळील नारळाच्या झाडाच्या टोकावर बसलेला नागरिकांनी त्याला पाहिले. शैलेश मुळीक यांच्या घराच्या पाठीमागील जागेत शेकरू उड्या मारत असल्याचे आढळून आले. कुतूहलाने मुळीक यांनी त्याचे फोटोही घेतले. थोड्यावेळाने तो झाडावर सहज उडी मारून गेला. त्यानंतर दिवसभर तो बांबूच्या बेटात व नारळाच्या झाडावर उड्या मारत होता. दुपारच्या तीव्र उन्हात कावळ्यांनी शेकरूला चोच मारून त्रास देण्याचाही प्रयत्न केला. सुभाष सुतार, शैलेश मुळीक या प्राणी मित्रांनी कावळ्याच्या त्रासातून शेकरूची सुटका केली. कावळ्यांचा त्रास व दिवसभर खाद्य न मिळाल्याने तो अशक्त झाल्याचा दिसत होता.शेकरू दिसायला गोंडस व आकर्षक असून तांबूस रंगाची झुपकेदार शेपूट आहे. शेकरू दिवसभर एका झाडावरून दुसऱ्या झाडावर सहज १५ ते २० फुटांची लांब झेप घेत होता. लालभडक डोळे, मिशा, अंगभर तपकिरी आणि गळ्यावर, पोटावर पिवळसर पट्टा असणारा शेकरू भादवणमध्ये आढळून आला आहे. दुपारी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी शेकरूला पकडण्यासाठी आले. मात्र त्यावेळी शेकरु बांबूच्या बेटात आत लपून बसला होता.तो बराच वेळ बाहेर आलाच नाही.मात्र सायंकाळी तो पुन्हा नारळाच्या झाडावर उंच टोकावर आढळून आला.शेकरूचा अधिवास आंबोलीच्या जंगलात....शेकरू हा दाट जंगलात व नारळ, माड, उंबर या झाडांवर हमखास आढळतो. त्याचा नैसर्गिक अधिवास आजऱ्यापासून जवळच असलेल्या आंबोलीच्या जंगलात आहे. मात्र अचानक तो भादवण गावात दिसल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. गेल्यावर्षी तो आर्दाळ गावात आढळून आला होता.शेकरूचा नैसर्गिक आधिवास जंगल तोडीमुळे संपुष्टात आला आहे.  दाट जंगलातील त्याचे खाद्य कमी झाल्यामुळे तो मानवी वस्तीकडे येत आहे. तो थोडासा लाजरा व उंच झाडावर वास्तव्य करुन राहत असल्याने त्याचा कोणालाही त्रास होत नाही.

- प्रा. डॉ. विनायक आजगेकर,प्राणीशास्त्र विभाग, आजरा महाविद्यालय.फोटोकॅप्शन - भादवण ( ता. आजरा ) येथे आढळलेला शेकरु.

टॅग्स :environmentपर्यावरणwildlifeवन्यजीवAmboli hill stationआंबोलि हिल स्टेशनkolhapurकोल्हापूरforest departmentवनविभाग