शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

लाल विजांमुळे येतो दुष्काळाचा अंदाज; पांढऱ्या शुभ्र विजा देतात चांगल्या मान्सूनची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 08:22 IST

इंद्रधनुष्याच्या प्रत्येक रंगात म्हणजे लाल, नारंगी, हिरवा, पिवळा, निळा, पारवा आणि जांभळा अशा सर्व रंगात विजा चमकत असतात.

मुंबई - पृथ्वीवर दर सेकंदाला ४४ विजा कोसळतात. विजांमुळे वित्त व जीवितहानी होत असली तरी लाल रंगाच्या विजा संभाव्य दुष्काळाचा ‘अलर्ट’ देतात, तर निळ्या आणि पांढऱ्या शुभ्र विजा या येणाऱ्या चांगल्या मान्सूनची आगाऊ सूचना देतात. त्यामुळे विजांवरून हवामानाचा अंदाज लावणे शक्य होते. शेतकऱ्यांसाठी विजांचे विज्ञान उलगडून दाखवलेय भौतिकशास्त्रज्ञ व हवामान संशोधक प्रा. किरणकुमार जोहरे यांनी.

विजांची रंगीत आतषबाजी! इंद्रधनुष्याच्या प्रत्येक रंगात म्हणजे लाल, नारंगी, हिरवा, पिवळा, निळा, पारवा आणि जांभळा अशा सर्व रंगात विजा चमकत असतात. तुलनेने पांढऱ्या शुभ्र दिसणाऱ्या विजांचे प्रमाण अधिक आहे.  कित्येकदा पांढऱ्या रंगात चमकणाऱ्या विजांच्या कडाभोवती दुसऱ्या रंगासह विजांचा लखलखाट जाणवतो.

‘मान्सून’दूत विजा! मान्सूनपूर्व काळात तीन महिने, तीन-पाच आणि सात अशी एकाच ठिकाणी येणारी विजांची वादळे हीदेखील त्या पंचक्रोशीत चांगल्या पावसाची सूचना देतात. मान्सूनच्या आधी आणि मान्सून संपताना वातावरणातील अस्थिरतेने विजा चमकतात. वातावरणातील अस्थिरतेमुळे वादळी वारे, गारांचा मारा, आकाशात ढगांचे पुंजके गडगडाट व कडकडाट असे विजांचे वेगवेगळ्या रंगछटा वा शेडमध्ये तांडव दिसणे ही मान्सूनपूर्व तसेच मान्सून उत्तर काळातील पाऊस ओळखण्याची साधीसोपी लक्षणे आणि सर्वसामान्य जनतेलादेखील लक्षात येईल अशा खुणा किंवा चिन्हे होत.

विजांबरोबर गारांचा मारा विजांचा लखलखाट होतो, तो केवळ अस्थिर वातावरण ऊर्ध्व दिशेने वाढत जाणारा पाणीदार क्युमुलोनिंबस ढगांमुळे ! क्युमुलोनिंबस ढग जमिनीपासून साधारणतः दोन किलोमीटरवर अंतरापासून सुरू होऊन बारा आणि कधी कधी तर पंधरा किलोमीटरपेक्षा अधिक उंचीपर्यंत वाढत जातात. परिणामी याच क्युमुलोनिंबस ढगांमध्ये बाष्पाचे व पाण्याचे कण हे सांद्रीभवन (Condensation) होत एकत्र येऊन गारा पडतात. क्युमुलोनिंबस ढग हे नेहमी मान्सूनपूर्व आणि मान्सूनउत्तर काळातच दिसून येतात.