शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

देखण्या पालीच्या नवीन प्रजातीचा शोध

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2019 11:43 AM

केरळ राज्यातील थेनमला भागातून नुकत्याच एका दुर्मीळ पालीचा शोध लागला आहे. ही पाल केरळ राज्यातील पश्चिम घाट परिसरात आढळली आहे.

ठळक मुद्देकेरळ राज्यातील थेनमला भागातून नुकत्याच एका दुर्मीळ पालीचा शोध लागला आहे. सातारा जिल्ह्यातील वन्यजीव अभ्यासक डॉ. अमित सय्यद यांनी या नव्या प्रजातीच्या पालीचा शोध लावला.ही पाल अशिया खंडातील सर्वात देखणी पाल असल्याचा सय्यद यांचा दावा आहे. 

प्रगती जाधव-पाटील

सातारा - केरळ राज्यातील थेनमला भागातून नुकत्याच एका दुर्मीळ पालीचा शोध लागला आहे. ही पाल केरळ राज्यातील पश्चिम घाट परिसरात आढळली आहे. सातारा जिल्ह्यातील वन्यजीव अभ्यासक डॉ. अमित सय्यद यांनी या नव्या प्रजातीच्या पालीचा शोध लावला आहे. ही पाल अशिया खंडातील सर्वात देखणी पाल असल्याचा सय्यद यांचा दावा आहे. 

डॉ. अमित सय्यद हे २०१५ सालापासून या पालीवर अभ्यास करत होते. १८७० मध्ये बेडॉम नामक ब्रिटिश वन्यजीव संशोधकांनी अशाच एका पालीचा शोध लावला होता. ती पाल या नवीन प्रजाती सारखीच दिसत असल्यामुळे तीच पाल आहे, असे गृहित धरले जात होते. भारतामध्ये आढळलेल्या व ब्रिटिश संशोधकांनी शोध लावलेले सर्व प्राणी हे नमुना रुपामध्ये  लंडन म्युझियम (एनएचएमयूके) येथे जतन करण्यात आले आहेत. डॉ. सय्यद यांनी लंडन म्युझियममधील जतन केलेल्या भारतातील सर्व  पालीच्या नमुन्याचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांच्या असे लक्षात आले की केरळमधील पाल ही नवीन प्रजातीची आहे. या पालीसाठी डॉ. सय्यद यांनी चार वर्षे अभ्यास केला. यादरम्यान केरळ व तामिळनाडू भागातील जंगलात जाऊन त्या पालीचे अस्तित्व, संख्या, प्रजनन व त्याच्या अन्नसाखळीचाही अभ्यास करण्यात आला. आशिया खंडातील ही सर्वाधिक देखणी पाल असल्याचा दावाही सय्यद यांनी केला आहे.

वन्यजीव अभ्यासक डॉ. अमित सय्यद यांनी आजपर्यंत भारतातून सहा पालींच्या व एका बेडकाच्या नवीन प्रजातीचा शोध लावला आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील एका अ‍ॅम्फिबिया अँड रेपल्टीलिया या वन्यजीव विभागाने त्यांची संशोधक म्हणून नियुक्ती केली आहे. सातारकरांसाठी ही अभिमानाची गोष्ट असून, देशातून तसेच विदेशातून त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे. 

देखण्या पालीची वैशिष्ट्ये!

या पालीला ‘नीमस्पिस अ‍ॅरणबोरी’ असे नाव दिले आहे. हे नाव अ‍ॅरणबोर नामक वन्यजीव संशोधक यांच्या नावाने देण्यात आले आहे. ‘नीमस्पिस अ‍ॅरणबोरी’ ही पाल ३५ मिलिमीटर एवढी लहान असून, खंडातील सर्वांत देखणी आहे,’ असे डॉ. सय्यद यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या पालीचे डोके पिवळ्या रंगाचे असून, मानेवर काळ्या आणि पांढºया रंगाचे पट्टे आहेत. उर्वरित संपूर्ण शरीर हे राखाडी रंगाचे असून त्यावर काळ्या आणि पांढºया रंगाच्या टिपक्यांची आगळी वेगळी नक्षी आहे. हा रिसर्च पेपर अमेरिकेतील झुटक्सा या शास्त्रीय संशोधन पत्रिकेत १५ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाला.

गेल्या चार-पाच वर्षांपासून मी या पालीचा अभ्यास करत आहे. याविषयीची माहिती आंतरराष्ट्रीय स्तरावर तपासून घेतल्यानंतर या पालीचा शोध मी लावल्याचा अभिमान वाटतो. आशिया खंडात ही सर्वात देखणी पाल असल्याचे माझं मत आहे. पश्चिम घाटातील समृद्ध वन्यजीव जगाच्या पटलावर आणण्यासाठी प्रयत्नशील आहे.

- डॉ. अमित सय्यद, वन्यजीव अभ्यासक, सातारा

भारतात आढळणारी कोणतीही पाल विषारी नाही, असे सय्यद सांगतात. त्यांच्या मते पाल सरपटणारा जीव आहे. त्यामुळे तिच्या अंगावर काही विषारी जीवांचा वावर असू शकतो; पण पालीमध्ये असं कोणतंही विष नाही, ज्यामुळे मनुष्य मरू शकेल. घरात असलेल्या माश्या, झुरळ, मच्छर हे पालीचे खाद्य आहे. त्यामुळे त्या घरात स्वच्छता दूत म्हणून वावरतात. पण सरपटणाऱ्या या जीवाविषयी घृणा असल्यामुळे सगळ्यांनाच पाली नकोशा वाटतात. वनस्पतींवर वाढणारे कीटकांचा नाश करण्यासाठीही पाली उपयुक्त आहेत.

 

टॅग्स :environmentपर्यावरणSatara areaसातारा परिसर