शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

साडेचार हजार किलोमीटरचा प्रवास; पिवळा धोबी करमाळा तालुक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 22:42 IST

उम्रड परिसरात विद्यार्थ्यांनी केली देशी-विदेशी ५७ पक्ष्यांची नोंद

- नासीर कबीर

करमाळा : तब्बल साडेचार हजार किलोमीटरचे अंतर पार करून आलेला पिवळा धोबी आणि दोन हजार किलोमीटरचा प्रवास करून करमाळा तालुक्यात आगमन झालेला पांढरा धोबी अशा देशी-विदेशी पक्ष्यांचे उम्रड परिसरात विद्यार्थ्यांनी निरीक्षण केले. दोन किलोमीटरच्या परिक्षेत्रात अशा ५७ पक्ष्यांची नोंद यावेळी करण्यात आली.

पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासन पुरस्कृत पर्यावरण सेवा योजना वामनराव बदे विद्यालयात गेल्या सहा वर्षांपासून असा उपक्रम राबविला जात आहे. योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना पर्यावरणातील विविध घटकांबद्दल सजग व संवेदनशील बनवून पर्यावरण संवर्धन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचाच भाग म्हणून पक्षीनिरीक्षणाचा उपक्रम राबविण्यात आला. आपल्या परिसरात असणारे पक्षी व त्यांचे महत्त्व या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी समजावून घेतले.

पक्षीनिरीक्षणादरम्यान विद्यार्थ्यांनी दोन किमीचा अंतर निश्चित करून पक्ष्यांचे निरीक्षण व नोंदी केल्या. या निरीक्षणामध्ये विद्यार्थ्यांनी ५७ प्रकारच्या स्थानिक व विदेशी पक्ष्यांची नोंद विद्यार्थ्यांनी केली. यामध्ये हळद्या, शिंपी, नाचरा, लालबुड्या बुलबुल, वेडा राघू याचबरोबर स्थलांतरित भोरडी, राखी बगळा, मोठा बगळा, चिकना कुदळ्या, पांढरा शराटी, नदी सुरय, हिवाळी सुरय, थापट्या बदक, राखी बदक, काळटोप कुरव अशा पक्ष्यांची नोंद विद्यार्थ्यांनी केली.

हा उपक्रम पर्यावरण सेवा योजनेचे विभाग समन्वयक गणेश सातव यांच्या मार्गदर्शनखाली राबविण्यात आला. यामध्ये गणेश सातव यांनी माणसांच्या सहवासात राहणारे पक्षी, शेती शिवारात आढळणारे पक्षी, गवताळ कुरणामध्ये व पाणथळ जागेमध्ये आढळणाºया पक्ष्यांबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. पक्ष्यांचे निरीक्षण व नोंदी करण्याबद्दलही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.  या उपक्रमात बदे विद्यालयातील इयत्ता आठवीचे विद्यार्थी, योजना प्रमुख संपत मारकड, महेश बदे व महावीर जगताप यांनी सक्रिय सहभाग घेतला. विद्यालयाचे मुख्याध्यापक संपत कोठावळे, सहशिक्षकांचे उपक्रमास सहकार्य मिळाले.ऑस्प्रे शिकारी पक्ष्याची प्रथमच नोंद

४ऑस्प्रे या शिकारी पक्ष्याची नोंद प्रथमच उमरड परिसरात करण्यात आली. हा पक्षी हिवाळ्यात स्थलांतरित करणारा पक्षी आहे. आपल्याकडे हा पक्षी अभावानेच दिसतो. हा एक विश्वव्यापी पक्षी असून, याचे प्रजनन युरोपमधील भौगोलिक परिस्थितीमध्ये होते. मासे हे त्याचे आवडते खाद्य आहे.४या वेळेस चार ते साडेचार हजार किमीचा प्रवास करून आलेला पिवळा परीट व दोन हजार किलोमीटरचा प्रवास करून आलेला पांढरा परीट या पक्ष्यांची नोंद विद्यार्थ्यांनी केली. या वेळेस योजनेंतर्गत उच्च प्रतीच्या दुर्बिणी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्यenvironmentपर्यावरण