शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

१७५ प्रजातींच्या फुलपाखरांचा विहार; मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत आहे मुक्त संचार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 7:38 AM

फुलपाखरांची ठिकाणे विखुरलेल्या स्वरुपात असून, मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईसारख्या काँक्रिटच्या जंगलात फुलपाखरांच्या आजही सुमारे १७५ च्या प्रजाती आढळत आहेत.

- सचिन लुंगसेमुंबई : मनुष्य प्राण्याने निसर्गावर केलेले अतिक्रमण, नष्ट केलेली जंगले, वाढत असलेले शहरीकरण अशा अनेक घटकांमुळे जैवविविधता नष्ट होत असली तरी दुसरीकडे निसर्ग वाचविण्यासाठी मोठया चळवळी उभ्या राहत आहेत.याच चळवळींचे फलित म्हणून आरेसारखी हिरवळ टिकून असून, या हिरवळतली फुलपाखरे आजही तग धरून आहेत. फुलपाखरांची ठिकाणे विखुरलेल्या स्वरुपात असून, मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईसारख्या काँक्रिटच्या जंगलात फुलपाखरांच्या आजही सुमारे १७५ च्या प्रजाती आढळत आहेत.हा आकडा ठोस नसून, तो वर खाली असू शकतो, असे फुलपाखरु अभ्यासकांचे म्हणणे आहे. आणि वाढते शहरीकरण हा फुलपाखरांसाठी वाढता धोका असल्याची निसर्ग अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.फुलपाखरांच्या ठिकाणांचा विचार करता मुंबईत धारावी येथील महाराष्ट्र निसर्ग उद्यान हे फुलपाखरे पाहण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. येथे प्रत्येक वर्षी फुलपाखरांच्या संवर्धनासाठी उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यापासून नागरिकांना फुलपाखरे पाहता यावीत म्हणून उद्यानातल्या उद्यानात फेरीचे आयोजन केले जाते. अभ्यासकांकडून उपस्थितांना फुलपाखराबाबत माहिती दिली जाते. या व्यतीरिक्त उर्वरित कार्यक्रम देखील हाती घेतले जातात. दुसरे ठिकाण म्हणजे मुंबईतले म्हणजे बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे होय. येथे देखील मोठया प्रमाणावर फुलपाखरांच्या प्रजाती आढळत असून, येथे देखील फुलपाखरे पाहण्यासाठी नागरिक दाखल होत असतात.विविध स्तरावर राबवले जातात उपक्रमदेशभरात सप्टेंबर हा महिना फुलपाखरांचा महिना साजरा केला जात असून, देशासह राज्य आणि मुंबईत ठिकठिकाणी फुलपाखरांच्या संवर्धनासाठी विविध स्तरावर उपक्रम राबविले जात आहेत. फुलपाखरांच्या प्रजातींच्या नोंदी करण्यासह प्रश्न-उत्तरे, छायाचित्रण, आॅनलाइन वर्कशॉपसह विविध उपक्रमांचा यात समावेश आहे.नॅशनल पार्कमध्ये वावरधारावी येथील महाराष्ट्र निसर्ग उद्यान, बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा ठाणे जिल्ह्यातील काही भाग, ठाण्यामध्येच ओवेकर वाडी बटर फ्लाय गार्डन येथे फुलपाखरे आढळतात. या व्यतिरिक्त मुंबईत ठिकठिकाणीही फुलपाखरे आढळतात. मात्र हे प्रमाण तुलनेने कमी आहे.कोणत्या प्रजातींना जिल्ह्यातकशामुळे धोका आहेमुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतल्या फुलपाखरांच्या संवर्धनाचा विचार करता मुंबईसह लगतच्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर शहरीकरण झाले आहे. साहजिकच याचा फटका निसर्गाला बसला आहे. आजघडीला विचार करता मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत फुलपाखरांच्या १७५ प्रजाती आढळतात. येथील फुलपाखरांची ठिकाणे ही विखरलेल्या स्वरूपात आहेत. मात्र फुलपाखरांसाठीची फळझाडे, फुलझाडे नामशेष होत असल्याने साहजिकच फुलपाखरांना धोका निर्माण झाला आहे.मोठ्या प्रमाणावर शहरीकरण होत आहे. याचा फटका साहजिकच निसर्गाला म्हणजे फुलपाखरांना बसत आहे. फुलपाखरांच्या अधिवासाला धोका निर्माण झाला आहे. फळझाडे, फुलझाडे नामशेष होत आहेत. याचा फटका फुलपाखरांना बसत आहे.- मंदार सांवत,अभ्यासक, संशोधकफुलपाखरांचे संवर्धन व्हावे म्हणून महाराष्ट्र निसर्ग उद्यानात काम सुरू आहे. प्रत्येक वर्षी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. नागरिकांसाठी उद्यानात फेरीचे आयोजन केले जाते. याद्वारे नागरिकांना फुलपाखरांचे दर्शन घडविले जाते. माहिती दिली जाते.- युवराज भारत पाटील,सहायक कार्यक्रम अधिकारी, महाराष्ट्र निसर्ग उद्यान संस्था, धारावी

टॅग्स :environmentपर्यावरण