शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

कास तलावाला कचऱ्याचे ग्रहण, पर्यावरणावर घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 17:52 IST

KasPathar, Garbage Disposal Issue, Satara area, environment सातारा शहराच्या पश्चिमेस २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या कास तलाव परिसरात मोठया प्रमाणावरील काचांच्या तुकडयांमुळे कचरा, घाणीच्या विळख्यांमुळे निसर्गरम्य कासचा श्वास घाणीत घुटमळू लागला आहे. कास तलावाला स्वच्छतेची प्रतिक्षा असून दिवसेंदिवस वाढत चाललेल्या घाणीच्या साम्राज्याने निसर्गप्रेमी नाराजी व्यक्त करू लागले आहेत.

ठळक मुद्देकास तलावाला कचऱ्याचे ग्रहण, पर्यावरणावर घाला, मद्याच्या बाटल्यांचा खचपर्यटक अन् वन्यजीवांना इजा होण्याचा संभव; निसर्गप्रेमींमधून निराशा

पेट्री/सातारा : सातारा शहराच्या पश्चिमेस २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या कास तलाव परिसरात मोठया प्रमाणावरील काचांच्या तुकडयांमुळे कचरा, घाणीच्या विळख्यांमुळे निसर्गरम्य कासचा श्वास घाणीत घुटमळू लागला आहे. कास तलावाला स्वच्छतेची प्रतिक्षा असून दिवसेंदिवस वाढत चाललेल्या घाणीच्या साम्राज्याने निसर्गप्रेमी नाराजी व्यक्त करू लागले आहेत.काचा, दारुच्या बाटल्या, पिशव्या, कागदी बोळयांनी कास परिसर अस्वच्छ बनला असून पाणी प्रदूषण होण्याची शक्यता आहे. ठिकठिकाणी चुली मांडून धुराचे लोटच्या लोट व तेथीलच परिसरातील सरपण गोळा करून हवेच्या प्रदुषणाबरोबरच पर्यावरणाचा ऱ्हास होऊ लागला आहे. दरम्यान शनिवार, रविवारी सुटीच्या दिवशी गाडीतल्या कर्णकर्कश डेकवर काही तरूणाई थिरकत असल्याने कास तलावावर पाणी पिण्याच्या मार्गावर असणाऱ्या वन्य पशुपक्ष्यांना आपला मार्गही बदलावा लागत आहे.कास तलाव परिसरातील या कचऱ्यांमध्ये दिवसेंदिवस होणाऱ्या वाढीमुळे भविष्यात जणू काही कास तलाव काच तलाव म्हणून ओळखला जाऊ नये, यासाठी पर्यटनास आलेल्या प्रत्येक पर्यटकांनी आपली मानसिकता बदलून स्वच्छ कास राहावा यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे. पाण्यात जलविहार करणे, पार्ट्यांची तेलकट भांडी , साबण अथवा डिटर्जंटने धुणे, काठावर गाडया लाऊन वाहनांचे वॉशिंग करणे यामुळे पाणी दुषित होण्याचा संभव अधिक असून तेल, साबणाचा फेस, ऑईल यामुळे जलचर प्राण्यांच्या जीवितास धोका उदभवण्याची शक्यता आहे.कोरोनाच्या पाश्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने या परिसरात पर्यटनास बंदी होती. परंतू सध्या कास तलावावर बहुसंख्य पर्यटक गर्दी करत आहेत ; वाढत्या अस्वच्छतेने पर्यावरणप्रेमीतून नाराजीचे सुर उमटत आहेत.

टॅग्स :Kas Patharकास पठारGarbage Disposal Issueकचरा प्रश्नSatara areaसातारा परिसरenvironmentपर्यावरण