शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

डोंगरी भागातील रानमाळावर फुलला करवंदे, जांभळाचा रानमेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 13:34 IST

ForestDepartment Environment Sangli : शिराळा तालुक्यातील डोंगरी भागातील रानमाळावर रानमेवा फुलला आहे. निसर्ग हा आपल्या सौंदर्याने पर्यटकांवर नेहमीच भुरळ पाडत असतो. खास करून येथील उन्हाळी हंगाम म्हणजे निसर्ग प्रेमींसाठी जणू पंढरीच असते. येथील आल्हाददायक वातावरण, सदाहरित निसर्ग, येथील म्हणजे रानमाळावर फुलणारा करवंदे, जांभूळ, डोंबले हा रानमेवा नेहमीच पर्यटक आणि स्थानिकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू असतो.परंतु सध्या कोरोनाचा प्रादुर्भावामुळे या पर्वणी पासून वंचित राहावे लागत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

ठळक मुद्देडोंगरी भागातील रानमाळावर फुलला करवंदे, जांभळाचा रानमेवा चांदोली, खुंदलापूर, मेणी खोरे आणि गुढे पांचगणी विभागात मुबलक रानमेवा

विकास शहाशिराळा : शिराळा तालुक्यातील डोंगरी भागातील रानमाळावर रानमेवा फुलला आहे. निसर्ग हा आपल्या सौंदर्याने पर्यटकांवर नेहमीच भुरळ पाडत असतो. खास करून येथील उन्हाळी हंगाम म्हणजे निसर्ग प्रेमींसाठी जणू पंढरीच असते. येथील आल्हाददायक वातावरण, सदाहरित निसर्ग, येथील म्हणजे रानमाळावर फुलणारा करवंदे, जांभूळ, डोंबले हा रानमेवा नेहमीच पर्यटक आणि स्थानिकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू असतो.परंतु सध्या कोरोनाचा प्रादुर्भावामुळे या पर्वणी पासून वंचित राहावे लागत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.उन्हाळ्यात चांदोली अभयारण्य परिसर, खुंदलापूर , उत्तर भागातील डोंगरी भागात, डोंगरदऱ्यामध्ये , मेणी खोरे आणि गुढे पांचगणी या विभागात मुबलक प्रमाणात मिळणारे करवंद, जांभूळ, इत्यादी रानमेवा म्हणजेच स्थानिक आणि पर्यटकांसाठी जणू मेजवानीच असते.  हा डोंगरी भाग असल्याने येथील जंगलात मोठ्या प्रमाणात मिळणारा हा रानमेवा आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. येथे आंबट, गोड,  करवंद आणि जांभूळ या रानमेवा उन्हाळ्यात  उपलब्ध असतो.मार्च ते जून या महिन्यामध्ये मिळणारा हा रानमेवा म्हणजेच पर्यटकांच्या आवडीचे फळे. काही पर्यटक तर खास डोंगर, जंगलात भटकंती करत याचा आस्वाद घेत असतात. जंगलात किंवा रस्त्याच्या कडेला असणारे तोरणे ही फळे दिसताच येणाऱ्या जाणाऱ्यांना याचा मोह आवरता येत नाही, त्यामुळे पाऊले आपोआपच थांबली जाऊन त्यादिशेने वळतात. जर आणखी एखाद्या वळीव पावसाने हजेरी लावली तर करवंदे वेगाने पिकतील मात्र लॉकडाऊनमुळे याचा आस्वाद मात्र घेता येणार नाही.खुंदलापूर आदी भागातील धनगर समाजातील महिला व पुरुष उदरनिर्वाहासाठी हा रानमेवा विकण्यासाठी शिराळा, इस्लामपूर, सांगली आदी भागात जातात पण सध्याचे कोरोनाचे  वातावरण पाहता सर्वत्र टाळेबंदी असल्याने या रानमेव्यांचा आस्वाद घेणे कठीणच होऊन बसले आहे.तसेच धनगर समाजातील या नागरिकांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

टॅग्स :wildlifeवन्यजीवshirala-acशिराळाSangliसांगलीforestजंगलenvironmentपर्यावरण