शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

कठड्यांमुळे वन्यप्राण्यांच्या मुक्त संचारास अडथळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 19:18 IST

Kas Pathar Wildlife FOrest Satara : सातारा शहराच्या पश्चिमेस सातारा-कास रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम अनेक दिवसांपासून सुरू आहे. या मार्गावर आटाळी गावच्या हद्दीत रस्त्याच्या दुतर्फा संरक्षक भिंतींचे बांधकाम करण्यात आले आहे. या भिंतींमुळे वन्यप्राण्यांच्या भ्रमणमार्गात अडथळे निर्माण होण्याची शक्यता असून, रस्ता अरुंद झाल्याने अपघातांचा धोका वाढला आहे.

ठळक मुद्देकठड्यांमुळे वन्यप्राण्यांच्या मुक्त संचारास अडथळा! सातारा-कास मार्ग : नैसर्गिक जंगल वाटा खुल्या करण्याची मागणी

पेट्री/सातारा : शहराच्या पश्चिमेस सातारा-कास रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम अनेक दिवसांपासून सुरू आहे. या मार्गावर आटाळी गावच्या हद्दीत रस्त्याच्या दुतर्फा संरक्षक भिंतींचे बांधकाम करण्यात आले आहे. या भिंतींमुळे वन्यप्राण्यांच्या भ्रमणमार्गात अडथळे निर्माण होण्याची शक्यता असून, रस्ता अरुंद झाल्याने अपघातांचा धोका वाढला आहे.जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पठार व तलाव परिसरात पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. फुलांच्या हंगामात लाखोंच्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांमुळे रस्त्यावर वारंवार वाहतुकीची कोंडी होत असते. सातारा-कास रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम वर्षभरापासून सुरू आहे.

अनेक ठिकाणी रस्ता खचण्याचे कारण देत, रस्त्याच्या दुतर्फा उंच व सलगपणे भिंती बांधल्या आहेत. आटाळी गावच्या हद्दीपासून कास पठारपर्यंत दोन्ही बाजूला विपूल जंगल आहे. या जंगलातील प्राण्यांची रस्त्याच्या दोन्ही बाजूला ये-जा सुरू असते. रस्त्याच्या वरील बाजूस काही गुहा तर रस्त्याच्या खालील बाजूस पाणवठे आहेत, परंतु या कठड्यांमुळे नैसर्गिक जंगल वाटा अडल्या जाऊन वन्यप्राण्यांच्या भ्रमणमार्गात अडथळे निर्माण होऊ लागले आहे.

आटाळी गावच्या हद्दीतील काही ठिकाणापासून ते घाटाई फाट्यापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा कठडे वनविभागाच्या हद्दीतच बांधले आहेत. त्यामुळे वनविभागाच्या हद्दीतच रस्ता खचतो का? या कठड्यांबाबत बांधकाम व वनविभागाकडे चौकशी केली, परंतु समाधानकारक माहिती मिळाली नाही. वन्य जिवांना मुक्त वावर करण्यास अडचणी निर्माण होणार आहेत.- सोमनाथ जाधव, माजी अध्यक्ष, कास पठार कार्यकारी समिती

संरक्षक कठड्यांमुळे रस्ता अरुंदरस्त्याच्या दुतर्फा असलेल्या संरक्षक कठड्यांमुळे रस्ता अरुंद झाला आहे. चार दिवसांपूर्वी एका चारचाकीला या ठिकाणी अपघात झाला होता. अपघातात जीवितहानी झाली नाही, परंतु वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. हे संरक्षक कठडे अनेक अडचणी करू लागल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Kas Patharकास पठारSatara areaसातारा परिसरforest departmentवनविभागwildlifeवन्यजीव