दुर्गम भागातील मतदान केंद्रांवर मतदान केंद्राधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पोहोचविले जाणार आहे. मागील निवडणुकीतही हेलिकॉप्टरचा वापर झाला होता. यावर्षी दोन हेलिकॉप्टर प्रशासनाने निवडणुकीसाठी उपलब्ध करून दिले आहेत. ...
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातील शेवटचे तीन दिवस आता शिल्लक आहेत. त्यामुळे युती आणि आघाडी या सामन्यातील रंगत वाढली आहे. अशात दोन्ही प्रमुख पक्षांसोबत त्यांचे मित्रपक्ष कितपत काम करीत आहेत याचा कानोसा लोकमत चमूने घेतला. ...
निवडणूक प्रचारादरम्यान कुणी दारूचा वापर करण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही तो खपवून घेणार नाही. ही निवडणूक दारूमुक्त करणार, असा ठराव आतापर्यंत देसाईगंज तालुक्यातील १५ गावांनी केला आहे. ...
वनसंपदेवर आधारित अनेक उद्योग स्थापन करण्यास गडचिरोली जिल्ह्यात वाव आहे. मात्र जिल्हा निर्मितीला ३५ वर्षांपेक्षा अधिकचा कालावधी उलटूनही एकही मोठा उद्योग निर्माण झाला नाही. ...
सुशिक्षीत बेरोजगारांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यासाठी ५०० कोटींची तरतूद करणार असून यातून सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध होईल, अशी ग्वाही राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. ...