शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

गुणवंतांची ही कसली कदर? बारा वर्षांत शिष्यवृत्तीत एका रुपयाचीही वाढ नाही !

By दीपक होमकर | Updated: October 14, 2022 06:43 IST

गुणवत्ता यादीत आल्यावरही वर्षाला मिळतात अवघे सरासरी ५०० रु.

- दीपक होमकर लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : गेल्या बारा वर्षांत शिक्षकांना सहावा आणि सातवा वेतन आयोग लागू झाल्यामुळे महिन्याला सुमारे पन्नास हजारांची वाढ झाली आहे. मात्र, ज्या विद्यार्थ्यांमुळे शिक्षकांचे अस्तित्व आहे त्यांच्या शिष्यवृत्तीत एक रुपयाचीही वाढ झाली नाही.

पाचवी आणि आठवीचे विद्यार्थी अतिशय कठीण असलेली शिष्यवृत्ती परीक्षा देतात. गुणवत्ता यादीत येणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारकडून शिष्यवृत्ती दिली जाते. २०१० पर्यंत शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत येणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यांना सुमारे १५० ते २५० रुपये, तर शहरी विद्यार्थ्यांना २५० ते ७०० रुपये शिष्यवृत्ती दिली जात होती. बारा वर्षांनंतरही २०२२ मध्ये हीच रक्कम मिळत आहे. रखडलेली शिक्षक भरती, न मिळणारे अनुदान, अतिरिक्त शिक्षक आणि वेळेवर न होणारे वेतन आदी विषयांवर माध्यमांकडून शिक्षणमंत्र्यांना सातत्याने प्रश्न विचारले जात हाेते. त्यावर संताप व्यक्त करत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ‘प्रचंड अभ्यास करून गुणवत्ता यादीत येणाऱ्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रकमेत अनेक वर्षांपासून काहीच वाढ झाली नाही, त्यावर कोणीच काही बोलत नाही’, अशी खंत व्यक्त केली होती.

‘लोकमत‘ने शिष्यवृत्तीची रक्कम किती? ती किती मुलांना दिली गेली,  त्यामध्ये कोणत्या साली किती वाढ झाली याची माहिती घेतली तेव्हा केसरकर यांची मुलांविषयीची खदखद खरी असल्याचे दिसले.महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित केली जाते. पूर्वी चौथी आणि सातवीसाठी ही परीक्षा घेतली जात होती. नंतर बदल करून पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ती घेतली जात आहे. उत्तीर्ण होणाऱ्या पहिल्या १५ ते सोळा हजार विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर केली जाते. त्यांना राज्य शासनाकडून दिली जाणारी शिष्यवृत्ती नाममात्रच आहे.

पाचवीसाठी तीन, तर आठवीसाठी दोन वर्षे पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतील विद्यार्थी गुणवत्ता यादीत आला तर त्याला सहावी, सातवी आणि आठवीसाठी दरवर्षी तीनशे ते पाचशे (ग्रामीण व शहरी वर्गीकरणानुसार) रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत उत्तीर्ण झाला असेल तर नववी व दहावी या दोन वर्षांसाठी शिष्यवृत्ती दिली जाते.