शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
3
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
5
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
6
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
7
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
8
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
9
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
10
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
11
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
12
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
13
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
14
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
15
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
16
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
17
जगप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन राणावत यांचे निधन; ९०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
19
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
20
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार

परीक्षेत उत्तम स्कोअर करायचा आहे? ह्या काही टिप्स आपल्याला उपयोगी पडतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 18:14 IST

कोणत्याही स्तरावरच्या परीक्षेमुळे खूप ताण होऊ शकतो. परीक्षांमध्ये उत्तम प्रदर्शन करण्याची गुरुकिल्ली स्मार्ट व योग्य प्रकारे केलेला अभ्यास आहे ज्यामुळे आपल्या प्रयत्नांमुळे लक्षवेधी प्रदर्शन आपण देऊ शकता.

(Image Credit : Social Media)

कोणत्याही स्तरावरच्या परीक्षेमुळे खूप ताण होऊ शकतो. परीक्षांमध्ये उत्तम प्रदर्शन करण्याची गुरुकिल्ली स्मार्ट व योग्य प्रकारे केलेला अभ्यास आहे ज्यामुळे आपल्या प्रयत्नांमुळे लक्षवेधी प्रदर्शन आपण देऊ शकता. स्मार्ट अभ्यास करायचा असेल तर कसे शिकावे, हे शिकण्याची महत्त्वपूर्ण पद्धत शिकावी लागते. कसे समजून घ्यावे, कसे जलद शिकावे आणि आधी शिकून घेतलेली माहिती दीर्घ काळ प्रभावी प्रकारे कशी टिकवावी, ह्यासाठी हे अतिशय महत्त्वाचे आणि आवश्यक असते व अनेक विद्यार्थ्यांना ते कठीण जाते. सीबीएसई परीक्षांमध्ये उत्तम स्कोअर मिळवण्याच्या 5 सोपे मार्ग असे आहेत:

फोकस ठेवा आणि दररोज अनेक विषयांची उजळणी करण्याचा प्रयत्न करा:

परीक्षेच्या आधी विद्यार्थी त्यांच्या ‘टू‌ डू’ यादीमध्ये दररोज एक विषय ठेवत असतात. एका दिवशी एकाच विषयाचा अभ्यास केल्यास तुम्ही एकाच प्रकारच्या माहितीमध्ये कन्फ्युज होण्याची शक्यता असते. म्हणून वेगाने शिकण्यासाठी, प्रत्येक विषयासाठी आपल्या अभ्यासाचा वेळ स्प्रेड करा. त्यामुळे एका किंवा दोन विषयांमध्ये खोलवर जाण्याच्या ऐवजी आपल्याला फोकस ठेवण्यासाठी मदत मिळेल.

नोटस काढा आणि त्या सतत रेफर करा:

शिकवण्याच्या- शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये काळजीपूर्वक ऐका आणि शिकवलेल्या संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न करा. महत्त्वाचे पॉईंटस नोट करा आणि परत एकदा ते जलद गतीने वाचा. त्यामुळे आपल्या दीर्घ कालीन स्मृतीमध्ये अधिक माहिती साठवण्यासाठी मदत मिळते.

आपण जे शिकत आहात, ते आपल्याला आधीच माहिती असलेल्या गोष्टीसोबत कनेक्ट करा:

‘मेक इट स्टिक: द सायंस ऑफ सक्सेसफुल लर्निंग’ ह्या पुस्तकामध्ये वैज्ञानिक हेन्री रोडिजर तिसरा आणि मार्क ए मॅकडॅनियल ह्यांनी असे सांगितले आहे की, आपण आपल्याला आधीच माहिती असलेल्या संकल्पनांसोबत नवीन संकल्पना जितक्या सक्षमपणे कनेक्ट करू शकू, तितकी आपण नवीन माहिती वेगाने शिकू शकू.

“आपल्या मित्राला शिकवा” पद्धत वापरून पाहा:

ही अतिशय प्रभावी पद्धत आहे ज्यामुळे आपल्या मनातील विषय स्पष्ट होतात. आपले पालक, भावंड, मित्र किंवा नातेवाईक अशा लोकांसोबत चर्चा करा आणि आपली उत्तरे त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. 

सुनियोजित (स्ट्रक्चर्ड) आणि स्पष्ट (क्रिस्प) उत्तरे लिहा. 

विद्यार्थी सामान्यत: शीर्षके, उपशीर्षके, बुलेट अशा गोष्टी वर्णनात्मक प्रश्नांच्या उत्तरांमध्ये लिहीत नाहीत. आपणे नेहमी बघितले पाहिजे की, आपल्या उत्तराची रचना उत्तम आहे आणि त्यासाठीची सर्वोत्तम पद्धत ही आहे की, उत्तर हे सुस्पष्ट, महत्त्वपूर्ण मुद्दे अधोरेखित करणारे आणि उत्तर पत्रिका स्वच्छ ठेवणारे असले पाहिजे.

विज्ञानाच्या उत्तरांच्या संदर्भात आकृत्या व्यवस्थित काढा व शक्य तिथे फ्लो चार्टस आणि आकृत्यांचा वापर करा. 

गणिताच्या उत्तरांसाठी केलेले रफ काम दिसेल ह्याची काळजी घ्या व ते उजव्या बाजूला योग्य प्रकारे एका चौकटीत ठेवा.कृपया लक्षात घ्या की, आपल्याला एक किंवा दोन प्रश्नांची उत्तरे येत नसतील, तरीही आपण नेहमी प्रश्न पत्रिकेतील सर्व प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत, कारण योग्य मांडणी असलेल्या व पूर्ण केलेल्या उत्तरपत्रिकेला नेहमीच चांगले गुण मिळतात.

जर आपल्याला आपला पेपर वेळेवर सोडवायचा असेल, तर आपली उत्तरे लिहीताना शब्द मर्यादेच्या पुढे जाऊ नका.लघु उत्तरे, बहुपर्यायी प्रश्न व दीर्घ उत्तरे ह्यांच्यासाठी आपल्या वेळेचे नियोजन करा. कृपया सुवाच्य व स्पष्ट हस्ताक्षरात लिहा.

जेव्हा आपण आपल्या परीक्षांची तयारी कराल, तेव्हा आपण दीर्घ काळ बसून अभ्यास करू नये. त्यामुळे आपण थकू शकता आणि आपण दीर्घ काळ शिकलेल्या गोष्टी लक्षात ठेवण्यापासून चुकू शकता.

आपण 25 मिनिटे पूर्ण लक्ष देऊन अभ्यास करा आणि त्यानंतर 5 मिनिटांचा ब्रेक घ्या. आपण ब्रेकनंतर परत अभ्यासाला बसू शकता. लक्षात ठेवा की, दिवसामध्ये 10 तासांपेक्षा जास्त वेळ अभ्यास करू नका.

भगवत् गीतेतील ओळी- “कर्मण्येsवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, मा कर्मफला हेतुर् भूमातये संगोस्त्व अक्रमणि” ह्याचा अर्थ असा आहे की, आपण आपल्या क्षमतांनुसार सर्वोत्तम ते करण्याकडेच लक्ष द्या आणि परिणामांची चिंता करू नका.

आपले यश मोठ्या प्रमाणात आपल्या दृष्टीकोनावर अवलंबून असते. आपल्या विषयांबद्दल उत्साह ठेवा आणि आपण यशस्वी व्हाल आणि आपली उद्दिष्टे पूर्ण कराल, असे स्वत:ला सकारात्मक प्रकारे सांगत राहा.

आपल्याला यशासाठी शुभेच्छा!

नाव: मिस. अनिता नायरपद: मुख्य अध्यापिकाऑर्चिडस द इंटरनॅशनल स्कूल पुणे

टॅग्स :examपरीक्षाEducationशिक्षण