शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 17:55 IST

UPSC Ravi Raj Story Success Story: रवी राज यांची अंधत्वावर मात; 2024 च्या UPSC परीक्षेत 182वा क्रमांक मिळवून बनले IAS अधिकारी.

UPSC Ravi Raj Story Success Story: यूपीएससी नागरी सेवा परीक्षा 2024चा अंतिम निकाल 22 एप्रिल रोजी जाहीर करण्यात आला. एकूण 1009 उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली. उतीर्ण झालेल्या अनेक उमेदवारांची सध्या सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये चर्चा सुरू आहे. आज आम्ही तुम्हाला अशा उमेदवाराबद्दल सांगणार आहोत, ज्याने या परीक्षेत 182वा क्रमांक मिळवून IAS पदाला गवसणी घातली. विशेष म्हणजे, हा उमेदवार पाहू शकत नाही. आपल्या व्यंगावर मात करत त्याने देशातील सर्वात कठीण परीक्षा उतीर्ण केली आहे. 

एका आजाराने दृष्टी गेली...बिहारच्या नवादा जिल्ह्यातील रहिवासी रवी राज(वय 24 वर्षे) याने आपले संपूर्ण शिक्षण नवादा येथून पूर्ण केले. त्याला लहानपणापासून अभ्यासाची आवड होती. दहावीत असताना एका आजारामुळे त्याची दृष्टी पूर्णपणे गेली. पण, रवीने कधीच या अंधत्वाला आपल्या यशाच्या वाटेत येऊ दिले नाही. पदवीनंतर त्याने यूपीएससीची तयारी सुरू केली अन् चौथ्या प्रयत्नात यश मिळवले. 

BPSC परीक्षा उत्तीर्ण, पण नोकरीला रुजू झाला नाहीविशेष म्हणजे, रवीने नोव्हेंबर 2024 मध्ये बिहार लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षादेखील उत्तीर्ण केली होती. त्या परीक्षेतून त्याची महसूल अधिकारी पदासाठी निवड झाली, परंतु UPSC चा अभ्यास करण्यासाठी नोकरीत रुजू झाला नाही. तीन वेळा यूपीएससीमध्ये नापास झाल्यानंतरही रवीने हार मानली नाही. प्रत्येक पराभवानंतर त्याने नव्याने तयारी केली अन् चौथ्या प्रयत्नात थेट IAS पदाला गवसणी घातली.

आई नोट्स बनवायची, वाचून दाखवायचीरवी अंध असल्यामुळे त्याला सामान्य माणसांप्रमाणे लिहिता वाचता येत नाही. रिपोर्ट्सनुसार, रवीची आई त्याचा अभ्यास घ्यायची. रवीची आई पदवीधर आहे, तर वडील शेतकरी आहेत. आई रवीची पुस्तके वाचून नोट्स तयार करायची आणि त्याला वाचून दाखवायची. शिवाय रवीला YouTube वर अभ्यासाचे विविध व्हिडिओही लावून द्यायची अन् रवी ऐकायचा. रवी आपल्या आईच्या मदतीने दररोज 10 तास अभ्यास करायचा. अतिशय प्रतिकुल रवीने सर्वोच्च शिखरावर पोहोचण्याचा पराक्रम केला आहे.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगexamपरीक्षाEducationशिक्षणInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी