सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; UPSC EPFO भरती जाहीर, जाणून घ्या सविस्तर माहिती...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 16:39 IST2025-07-29T16:39:31+5:302025-07-29T16:39:51+5:30
UPSC EPFO : केंद्रीय लोकसेवा आयोगाने अंमलबजावणी अधिकारी आणि सहाय्यक पीएफ आयुक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे.

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; UPSC EPFO भरती जाहीर, जाणून घ्या सविस्तर माहिती...
UPSC EPFO : नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने अंमलबजावणी अधिकारी आणि सहाय्यक पीएफ आयुक्त पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ ऑगस्ट २०२५ आहे.
रिक्त पदांची माहिती
या भरती मोहिमेअंतर्गत २३० पदांची भरती केली जाईल.
अंमलबजावणी अधिकारी / लेखा अधिकारी: १५६ पदे
सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त: ७४ पदे
अर्ज कसा करावा
सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
यानंतर होमपेजवरील संबंधित लिंकवर क्लिक करा.
पुढे उमेदवाराने स्वतःची नोंदणी करावी.
नोंदणी केल्यानंतर उमेदवार त्यांचा अर्ज भरू शकतात.
अर्ज भरल्यानंतर सबमिट करा.
अर्ज शुल्क?
या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून २५ रुपये भरावे लागतील. तर, महिला/अनुसूचित जाती/जमाती/बेंचमार्क अपंगत्व असलेल्या उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट आहे. अधिक माहितीसाठी, उमेदवार यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.