शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
2
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
3
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
4
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
5
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
6
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
7
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
8
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
9
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
10
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
11
पंडित नेहरुंच्या शब्दांनी भाषणाची सुरुवात; न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ममदानींचा व्हिडिओ व्हायरल...
12
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं आधीच दिलाय मोठा इशारा
13
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
14
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
15
"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल
16
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
17
समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’
18
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
19
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!

IIT-IIM नव्हे, 'या' विद्यापीठातून शिकलेल्या विद्यार्थ्याला मिळालं १.१३ कोटींचं खणखणीत पॅकेज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2023 15:11 IST

मध्य प्रदेशच्या इंदौर येथे देवी अहिल्या विश्वविद्यालयाचा (DAVV) विद्यार्थी साहिल अली यानं नेदरलँड स्थित टेक्नोलॉजी फर्म एडियन कंपनीत १.१३ कोटींचं पॅकेज

नवी दिल्ली-

मध्य प्रदेशच्या इंदौर येथे देवी अहिल्या विश्वविद्यालयाचा (DAVV) विद्यार्थी साहिल अली यानं नेदरलँड स्थित टेक्नोलॉजी फर्म एडियन कंपनीत १.१३ कोटींचं पॅकेज प्राप्त करत विद्यापीठाचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. आयआयटी आणि आयआयएम प्लेसमेंटचेही रेकॉर्ड ब्रेक करत साहिलनं एक नवा आदर्श विद्यार्थ्यांसमोर ठेवला आहे. साहिल यानं अहिल्या विश्वविद्यालयातून एमटेकची डिग्री पूर्ण केली आणि फेब्रुवारी २०२३ मध्ये एडियनमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर पदासाठी नोकरी मिळवली आहे. 

अहिल्या विश्वविद्यालयाच्या विद्यार्थ्याला इतकं मोठं पॅकेज मिळवणारा साहिल पहिला विद्यार्थी ठरला आहे. डोळ्यासमोर एक लक्ष्य ठेवून तयारी केल्याचं साहिल सांगतो. डीएव्हीव्हीच्या इंटरनॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ प्रोफेशनल स्टडीजमध्ये  (आयआयपीएस) शिक्षण पूर्ण करुन साहिलनं आपलं करिअर केलं. विशेष म्हणजे साहिल हुशार तर आहेच, पण तंत्रज्ञानाशी संबंधित विषय शिकण्यात तो नेहमीच पुढे असायचा. एडियन येथे साहिलला सॉफ्टवेअर इंजिनिर पद मिळण्याआधीच त्यानं इटबर्प डेव्हलपर्स, कोडेन्सियस, क्लिफ.एआय, ग्रीनडेक, पायथन सॉफ्टवेअर फाऊंडेशन, गिटहब आणि क्रेड सारख्या प्रमुख संस्थांमध्ये इंटर्नशीप करुन अनुभव प्राप्त केला आहे. या अनुभवातूनच वेगवेगळ्या डोमेनवर काम करण्याचा हातखंडा साहिलकडे आहे.

साहिल आपल्या यशाचं संपूर्ण श्रेय आई-वडील आणि शिक्षकांना देतो. प्लेसमेंट इंटरव्ह्यूसाठी साहिलनं प्रचंड तयारी केली होती. सध्या देशात आयआयटीमधून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कोट्यवधींचे पॅकेजेस मिळत असल्याच्या बातम्या येतच असतात. पण एका गैर-आयआयटी संस्थेतून उत्तीर्ण होऊन कोट्यवधींचं पॅकेज प्राप्त करणारा साहिल सर्वांपेक्षा वेगळा ठरतो. 

टॅग्स :IIT Mumbaiआयआयटी मुंबईEducationशिक्षण