शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

शैक्षणिक वर्षासाठी अद्याप मार्गदर्शक सूचना नाहीत, मुख्याध्यापक नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 09:39 IST

Education News: मागील वर्षभराहून अधिक काळ शाळा बंद होत्या. त्यामुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू करताना सगळ्या गोष्टींचा, विषयांचा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे परीक्षा, चाचण्या यांचा नियोजनाचा आराखडा शाळांना तयार करणे आवश्यक असणार आहे.

मुंबई : यंदाचे शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष हे येत्या १४ जूनपासून सुरू होणार आहे, असे शिक्षण विभागाकडून उन्हाळी सुट्टी संदर्भातल्या परिपत्रकात जाहीर केले आहे. मात्र, मे महिनाअखेर ही नवीन शैक्षणिक वर्षात ते यंदा कसे सुरू करणार, ते ऑनलाइन असणार का ऑफलाइन, मुख्याध्यापकांसाठी काय मार्गदर्शक सूचना आहेत याबाबत काहीच माहिती शाळांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्यातील मुख्याध्यापक आणि संस्थाचालकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.मागील वर्षभराहून अधिक काळ शाळा बंद होत्या. त्यामुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू करताना सगळ्या गोष्टींचा, विषयांचा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे परीक्षा, चाचण्या यांचा नियोजनाचा आराखडा शाळांना तयार करणे आवश्यक असणार आहे. सद्य:स्थितीत जरी निर्बंध उठणार नसले तरी आणि शिक्षण ऑनलाईन असले तरी त्याचेसुद्धा तासिकानिहाय नियोजन करावे लागणार आहे. मागील वर्षी काही महत्त्वाच्याच विषयांचे ऑनलाइन नियोजन करण्याच्या सूचना होत्या. मात्र, यावर्षी तसे न करता सगळ्या विषयांचे नियोजन शाळांना करावे लागणार असल्याची माहिती उपनगरातील शाळेच्या एका मुख्याध्यापकांनी दिली.महत्त्वाचे म्हणजे जे विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेऊ शकणार नाहीत, त्यांनाही शिक्षण पोहोचविण्याची अतिरिक्त जबाबदारी शाळांवर असणार आहे. लॉकडाऊन निर्बंध शिथिल झाले, तर नवीन शैक्षणिक वर्षासाठी, दहावी बारावी मूल्यांकनासाठी शिक्षकांना, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळांमध्ये बोलावण्याचे नियोजनही करावे लागणार आहे. यासंदर्भात शिक्षण विभागाने आताच मार्गदर्शक सूचना दिल्या असत्या तर संस्थाचालकांना, मुख्याध्यपकांना त्याप्रमाणे शैक्षणिक वेळापत्रक तयार करता आले असते, असे मत मुख्याध्यापक व्यक्त करीत आहेत.१४ जून पासून शाळा सुरू करायच्या आहे मात्र त्या ऑनलाइन कि ऑफलाइन ? ऑनलाइन असल्या तर कशा ? यासाठी मार्गदर्शक सूचना मिळाल्यास उपयुक्त ठरणार आहे. पहिली ते आठवीच्या मुलांना सरसकट पास केल्यानंतर त्यांच्यासाठी ब्रिज कोर्स सुरू करण्यात येईल असे परिपत्रकात सांगितले होते. हा ब्रीज कोर्स कसा सुरु करायचा तसेच त्यासाठी शिक्षकांचे प्रशिक्षण आवश्यक आहे ,याबाबतीतही अजून कोणतेही निर्देश प्राप्त झालेले नाहीत, अशी प्रतिक्रिया के. व्ही. के. घाटकोपर सार्वजनिक स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य जगदीश इंदलकर यांनी दिली. 

वर्षभरात कोरोनाच्या परिस्थितीचा अंदाज आल्यानंतर शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना देणे गरजेचे होते. यामुळे आम्हाला शाळा ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन यासाठी वर्षभराचे वेळापत्रक तयार करण्यासाठी वेळ मिळाला असता.- पांडुरंग केंगार, सचिव, मुख्याध्यापक संघटना, मुंबई.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रEducationशिक्षणMaharashtraमहाराष्ट्र