शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
3
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
4
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
5
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
6
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
7
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
8
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
9
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
10
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
11
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
12
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
13
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
14
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
15
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
16
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
17
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
18
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
19
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
20
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा

प्राध्यापक भरतीच्या ‘यूजीसी’च्या सूचनांना राज्य शासनाचा ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 6:52 PM

 १०० टक्के जागा भरण्याचा चौथ्यांदा दिला आदेश

ठळक मुद्दे राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने पत्राची कोणतीही दखल घेतलेली नाही.

- राम शिनगारे 

औरंगाबाद : देशातील उच्चशिक्षण देणाºया अनुदानित संस्थांमध्ये प्राध्यापकांच्या हजारो जागा रिक्त आहेत. रिक्त जागा १०० टक्के भरण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) देशातील राज्य शासनांना वारंवार आदेश दिले आहेत. मात्र, महाराष्ट्र शासनाने १०० टक्के प्राध्यापक भरतीला ठेंगा दाखविला असल्याचे चित्र राज्यात निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर यूजीसीने पुन्हा एकदा पत्र पाठवून जागा भरण्याचे आदेश दिले आहेत.

विद्यापीठ अनुदान आयोगाने मागील आठवड्यात विद्यापीठ, संलग्न महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरण्यासाठीचे वेळापत्रकच महाविद्यालये, विद्यापीठांना पाठविले आहे. या पत्रात रिक्त जागांची आकडेवारी २० सप्टेंबरपर्यंत आॅनलाईन दाखल करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. देशातील विद्यापीठे आणि महाविद्यालयातील अध्यापन, गुणवत्ता, परीक्षा आणि संशोधन वाढविण्यासाठी प्राध्यापक भरती प्राधान्याने करणे आवश्यक असल्याचेही यूजीसीने म्हटले आहे. महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरल्यानंतर यूजीसीकडून मिळणाऱ्या अनुदानात, प्रकल्पात वाढ करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले. ३१ जुलै २०१९ पासून आतापर्यंत चार वेळा पत्र काढून यूजीसीने प्राध्यापक भरतीचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे. 

यासाठी पदभरतीचे थेट वेळापत्रकच काढले आहे. मात्र, यावर राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने पत्राची कोणतीही दखल घेतलेली नाही. २०१८ च्या अखेर राज्य शासनाने एकूण रिक्त पदाच्या ४० टक्के आणि महाविद्यालयातील रिक्त पदांच्या ८० टक्के जागा भरण्यास सुरुवात केली आहे. मात्र, या परवानगीनंतरही खाजगी अनुदानित महाविद्यालयांनी जागा भरण्यास उत्साह दाखविलेला नाही. त्यामागे आर्थिक कारणे असल्याचे बोलले जात आहे.

यूजीसीने जाहीर केलेले वेळापत्रकयूजीसीने जाहीर केलेल्या वेळापत्रकात विद्यमान रिक्त जागांसह आगामी सहा महिन्यांत रिक्त होणाºया जागांवर प्राध्यापक भरती करण्याच्या सूचना केल्या आहेत. आरक्षण तपासून रिक्त जागा १५ दिवसांच्या आत जाहीर कराव्यात, रिक्त जागा भरण्यासाठी ३० दिवसांच्या आत संबंधित अधिका-यांची परवानगी घ्यावी, ३० दिवसांत परवानगी न दिल्यास मान्यता असल्याचे मानावे, रिक्त जागांना मान्यता मिळाल्यास १५ दिवसांत भरण्यासाठी राष्ट्रीय दैनिकात जाहिरात द्यावी, त्यानंतर पात्रताधारकांना अर्ज करण्यास एक महिन्याचा कालावधी द्यावा, निवड समिती अंतिम करण्याची प्रक्रिया वरील कालावधीच्या काळात समांतर पद्धतीने करावी, निवड समितीच्या सदस्यांच्या वेळा १५ दिवसांत ठरवाव्यात, त्याचवेळी महिनाभरात मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची यादी आॅनलाईन जाहीर करावी, त्यानंतर उर्वरित सर्व प्रक्रिया महिनाभरात पार पाडावी, असेही या वेळापत्रकात म्हटले आहे.

...तर राज्यातील उच्चशिक्षणाचे वाटोळे होईलराज्यातील अनुदानित महाविद्यालयांतील प्राध्यापक भरती अंशत: सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र, प्रत्यक्षात भरती होताना दिसत नाही.  संस्थाचालक परवानगी मिळालेल्या जागा भरण्यास उत्सुक नाहीत. याचा विचार करावा लागेल. आमच्या संघटनेतर्फे प्राध्यापक भरतीसाठी विविध आंदोलने केली. तासिका तत्त्वावर वेठबिगारीसारख्या नेमणुका करून शासन उच्चशिक्षणाचे वाटोळे करीत आहे. अशा पद्धतीच्या धोरणामुळे गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. ही परिस्थिती सुधारण्यास कठीण जाणार आहे. याचे खापर राज्य शासनावरच फुटेल, हे नक्की.- डॉ. विक्रम खिलारे, बामुक्टो 

यूजीसीच्या सूचनांचे  पालन झाले पाहिजेविद्यापीठ अनुदान आयोग उच्चशिक्षणातील गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध योजना राबवत आहे. या योजना यशस्वी करण्यासाठी महाविद्यालये, विद्यापीठांमध्ये शिकविण्यासाठी, संशोधनासाठी प्राध्यापक असणे अत्यंत गरजेचे आहे. रिक्त जागा भरल्यास यूजीसीच्या विविध योजनांमधून अनुदान देता येईल. मात्र, राज्य विद्यापीठांना जागा भरण्यास सक्ती करू शकत नाही. यूजीसी देत असलेल्या निधीतील विद्यापीठांच्या जागा १०० टक्के भरल्या जातील.- डॉ. भूषण पटवर्धन, उपाध्यक्ष, यूजीसी

राज्य शासनाची मान्यता आवश्यकविद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांतील १०० टक्के जागा भरण्याविषयी पत्र यूजीसीने काढले आहे. मात्र, आपल्याला जागा भरण्यासाठी राज्य शासनाची मान्यता आवश्यक आहे. सध्या विद्यापीठातील काही जागा भरण्यास मान्यता मिळाली आहे. त्यानुसार प्रस्ताव शासनाला पाठविला आहे.- डॉ. प्रमोद येवले, कुलगुरू

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रcollegeमहाविद्यालयuniversityविद्यापीठProfessorप्राध्यापक