शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

School Reopening : आम्हाला शाळेत जायचंय; ८२ टक्के विद्यार्थी उत्सुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 07:14 IST

७१ टक्के विद्यार्थ्यांना हवे संमिश्र शिक्षण 

ठळक मुद्दे७१ टक्के विद्यार्थ्यांना हवे संमिश्र शिक्षण 

मुंबई : कोरोना संकटामुळे शाळा टप्प्याटप्प्याने आणि संमिश्र (हायब्रीड मॉडेल) पद्धतीने सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांसह पालकांकडून होत आहे. शाळा सुरू झाल्यानंतर प्रत्यक्ष पद्धतीने वर्ग भरवले तरी यापुढे हायब्रीड मॉडेल (संमिश्र शिक्षणपद्धती) वापरावे, असे मत ७१ टक्के विद्यार्थ्यांनी सर्वेक्षणात नोंदवले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्याबद्दल काय वाटते? पालकांची काय तयारी आहे? शाळांनी काय तयारी केली, यासंबंधात देशव्यापी सर्वेक्षण करण्यात आला. या सर्वेक्षणाद्वारे शाळा सुरू झाल्यावर सुमारे ८२ टक्के विद्यार्थी शाळेत जाण्यास उत्सुक असल्याचे समोर आले आहे. 

महाराष्ट्रात येत्या ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू होत आहेत, तर देशातील इतर राज्यांत अनेक ठिकाणी शाळा सुरू झाल्या आहेत, काही ठिकाणी होणार आहेत. ब्रेनली या ऑनलाईन शैक्षणिक व्यासपीठ पुरविणाऱ्या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात विविध राज्य, जिल्ह्यातील पालक, विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि आपले मत नोंदवल. 

या सर्वेक्षणातून ८२ टक्के विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये जाण्यास तयारी दर्शवली, तर १८ टक्के विद्यार्थी सुरक्षिततेच्या कारणास्तव शाळांमध्ये जाण्यास तयार नाहीत. शाळा सुरू झाल्यावरही पालकांची संमती आवश्यक आहे. त्यामुळे पालक, विद्यार्थ्यांना शाळेत प्रत्यक्षात होणाऱ्या वर्गात पाठवण्यास तयार आहेत का, या प्रश्नाला ६० टक्के विद्यार्थ्यांनी होकार दर्शविला. तर १९ टक्के पालक अद्यापही तयार नसल्याचे समोर आले आहे. १९ टक्के पालक अजूनही द्विधा मन:स्थितीत असल्याने प्रश्नाचे उत्तर देऊ शकलेले नाहीत, असे संस्थेने केलेल्या या सर्वेक्षणातून समोर आलेले आहे.

  • महाराष्ट्रात ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्यात येणार असल्या तरी मुलांना शाळेतील उपस्थिती बंधनकारक करण्यात आलेली नाही. मात्र इतर काही राज्यांत काही शाळांनी ती बंधनकारक केलेली आहे. सर्वेक्षणात सहभागी विद्यार्थ्यांपैकी ५५ टक्के विद्यार्थ्यांना उपस्थिती बंधनकारक केल्याचे, तर ४४% विद्यार्थ्यांना ती बंधनकारक नसल्याचे समोर आले आहे.
  • प्रत्यक्षातील वर्ग सुरू करताना किंवा झालेले असताना शाळा आरोग्य सुरक्षिततेसाठी आवश्यक सर्व नियमांचे पालन व सुविधा पुरवत आहे का, या प्रश्नाचे उत्तर देताना ७८ टक्के विद्यार्थ्यांनी होकार दिला. तर २१ टक्के विद्यार्थ्यांनी सुविधांचा अभाव असल्याचे मत नोंदवले आहे. त्यामुळेच अनेक पालक मुलांना शाळांमध्ये पाठविण्यास अद्यापही तयार नसल्याचे निरीक्षण सर्वेक्षणात नोंदवले आहे. 
  • सद्यस्थितीत सर्वेक्षणातील ८२ टक्के मुले अद्यापही ऑनलाईन शिक्षण घेत असून पुढेही प्रत्यक्ष वर्ग भरले तरी ते ऑनलाईन शिक्षण घेणार असल्याचे मत ७३ टक्के विद्यार्थ्यांनी नोंदवले आहे. 

विद्यार्थी, पालकांनी काहीअंशी गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ ऑनलाईन शिक्षणपद्धतीशी जुळवून घेतले. मात्र प्रत्यक्ष वर्गांची ओढ आणि आवश्यकता जास्त असल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट होत आहे. शाळेतील संवाद, शिक्षण, मैत्री, शारीरिक व बौद्धिक वाढ यांचे शाळेत मिळणारे प्रत्यक्षातील शिक्षण कोणतेही तंत्रज्ञान घेऊ शकत नाही. मात्र ऑनलाईन शिक्षणाकडून प्रत्यक्ष शिक्षणाची वाटचाल ही सुरक्षितता लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने करायला हवी. राजेश बिसणी, सीपीओ, ब्रेनली

टॅग्स :Schoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसEducationशिक्षण