शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

शिक्षणासाठी विद्यार्थी, पालकांची पनवेलला पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 23:56 IST

पनवेल हे तालुक्याचे ठिकाण असले, तरी मुंबईच्या जवळ असल्याने येथील विकास झपाट्याने झाला. त्यामुळे येथे शैक्षणिक विकासही मोठ्या प्रमाणात आणि चांगला झाल्याचे आजस्थितीत दिसून येत आहे. त्यामुळे आजपासच्या ग्रामीण भागांतून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षणासाठी येतात.

- वैभव गायकरपनवेल शहरातील बाजारपेठ, चाकजोड निर्मिती केंद्र, औषधांचे कारखाने, बंदर ही पनवेलची जुनी ओळख आहेच. मात्र, शैक्षणिक क्षेत्रातही पनवेल मागे राहिले नाही. उत्तम शैक्षणिक दर्जा आणि सोईसुविधांमुळे पनवेलच्या शाळा-कॉलेजांना आज वेगळी ओळख मिळाली आहे. आज पनवेलची ओळख शैक्षणिक हब म्हणून आहे.मुंबई आणि पुणे या दोन महानगरांच्या मध्यभागी पनवेल असल्याने चौफेर बदल अनुभवयाला मिळतोय. त्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे हे महानगर जगाच्या नकाशावर अधोरेखित होत आहे. त्यात पनवेलमधील सिडको वसाहती स्मार्ट करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहे. याच कारणाने पनवेल परिसरात खासगी शिक्षण संस्थांनी या परिसरात शैक्षणिक संकुल सुरू केले. वास्तविक पाहता, पनवेलचा शैक्षणिक स्तर कायम वर राहिला आहे. रायगड जिल्हा परिषद आणि पनवेल महानगरपालिका शाळांबरोबरच कोकण आणि सुधागड एज्युकेशनचे योगदान खूप मोठे आहे. गेल्या काही वर्षात पनवेल, नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे परिसरात खासगी शिक्षण संस्था आल्या आहेत. त्यातल्या त्यात इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संख्याही वाढली आहे. सेंट जोसेफ, कारमेल, महात्मा स्कूल, डी.ए. व्ही पब्लिक स्कूल, बालभारती या शाळांमध्ये प्रवेश घेण्याकरिता पालकांची चढाओढ लागते. पूर्वी शिक्षण म्हटले की, चटकन पुणे हे नाव तोंडात यायचे. याचे कारण हे शहर शिक्षणाचे माहेरघर आणि राज्याची शैक्षणिक राजधानी आहे. मात्र, आता त्याच तोडीचे एज्युकेशन म्हणून खारघरचे नाव पुढे आले. सायबर सिटी म्हणून या शहराचे नाव आहेच, आता शिक्षण संस्था येथे एकटवल्या असल्याने वेगळे ग्लॅमर आले आहे. भारती विद्यापीठ, एस.सी. पाटील, जी. डी. पोळ, आयटीएम, सरस्वती यासारखी महत्त्वाची कॉलेज खारघरमध्ये आहेत. येथे देशभरातून विद्यार्थी शिकायला येत आहेत.तसेच या शहरात फॅशन डिझाइनचे कॉलेज आहे. याशिवाय दर्जेदार माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा या सिटीचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. वैद्यकीय, अभियांत्रिकी, मॅनेजमेंट , नर्सिंग, आर्किटेक्चरचे शिक्षण येथे मिळते. लाखो विद्यार्थी या अभ्यासक्रमाचे धडे घेत आहेत. याशिवाय सीकेटी, पिल्लाई, एमजीएम ही महाविद्यालये अनुक्रमे खांदा वसाहतीत आहेत. विसपुते शैक्षणिक संकुलात विविध कोर्सेस आहेत, त्याचबरोबर एस.पी. मोरे महाविद्यालयात हॉटेल मॅनजमेंट करण्याची सुविधा उपलब्ध आहे. आता एज्युकेशनचे वारे थेट पळस्पे, शिरढोणपर्यंत पोहोचले आहे. येथे शिवाजी महाराज विद्यापीठ सुरू झाले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी चांगली इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू झाल्याने आजूबाजूची मुले येऊ लागली. त्यांच्यासाठी चांगली सुविधा निर्माण झाली. आता या पट्ट्यात डीपीएस, एमएनआर या शाळा आल्या. भविष्यात या भागात आणखी शिक्षण संस्था येतील, याचे कारण पळस्पे भविष्यात मोठे जंक्शन होऊ लागले आहे. शेंडूगला वेलफ्रेड कॉलेज, तसेच शाळा गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे.एकंदरीतच पनवेलला विमानतळ, नैना, पुष्पकनगर आले असल्यामुळे गृहनिर्मिती वाढली, पर्यायाने शैक्षणिक संस्था वाढल्या; त्यामुळे विद्यार्थ्यांना मुंबई, पुणे या महानगरांऐवजी येथेच शिक्षणाचे अनेक पर्याय मिळाले. म्हणून पनवेल एज्युकेशन हब बनतेय.

टॅग्स :Educationशिक्षण