शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 06:56 IST

Foreign Universities In Navi Mumbai: नवी मुंबईतील एज्युसिटीमध्ये पाच परदेशी विद्यापीठांसाठी आशयपत्र प्रदान करण्यात आली.

मुंबई : नवी मुंबईतील एज्युसिटीमध्ये पाच परदेशी विद्यापीठांसाठी आशयपत्र प्रदान करण्यात आली. मुंबईला ग्लोबल एज्युहब बनविण्याचे स्वप्न आज सुरू होत असून, येत्या काळात आणखी पाच परदेशी विद्यापीठे येतील. त्यांच्याशी बोलणी सुरू आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

क्रिएटिंग ॲन इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी’ अंतर्गत हा कार्यक्रम शनिवारी पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय शिक्षण सचिव तथा विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष विनित जोशी, अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, ब्रिटनच्या उच्चायुक्त लिंडी कॅमेरॉन, ऑस्ट्रेलियाचे कॉन्सुल जनरल पॉल मर्फी, अमेरिकेचे कॉन्सुल जनरल माईक हँकी, इटलीचे कॉन्सुल जनरल वॉल्टर फेरारा उपस्थित होते. या परदेशी विद्यापीठांना नवी मुंबईत आणण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी कौस्तुभ धवसे यांनी विशेष प्रयत्न केले. या कार्यक्रमाचेही त्यांनीच सूत्रसंचालन केले. 

नवी मुंबईतील नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळापासून जवळच एज्युसिटी २५० एकर क्षेत्रात साकारली जात आहे. एज्युसिटी येथे आगामी कालावधीत १० विद्यापीठे एकत्र येतील, अशी संकल्पना असल्याचे  फडणवीस म्हणाले. आता परदेशी विद्यापीठे भारतात येत असल्याने आपल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या देशात उच्च शिक्षणासाठी जाण्याची गरज नाही. आर्थिक अडचणीमुळे विद्यार्थी तिथे जाऊ शकत नाहीत. मात्र, आता त्यांना परदेशी विद्यापीठांच्या भारतातील कॅम्पसमध्ये शिकता येईल. जागतिक दर्जाचे हे शिक्षण विद्यार्थ्यांना २५ ते ३३ टक्के खर्चात मिळेल, असेही फडणवीस यांनी सांगितले.

हरयाणा, बंगळुरूसह मुंबईत नऊ परदेशी विद्यापीठांचे कॅम्पस सुरू होतील. आणखी सहा विद्यापीठांचे प्रस्ताव चर्चेत आहेत. नवीन शैक्षणिक धोरणाचा फायदा देशाला मिळेल. आपल्या शिक्षण संस्थांना परदेशामध्ये शाखा उघडता येतील. आयआयटी मद्रास, दिल्ली, आयआयएम अहमदाबाद आदींचे कॅम्पस परदेशात सुरू केले आहेत.धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय शिक्षण मंत्री  

या विद्यापीठांना इरादापत्रयुनिव्हर्सिटी ऑफ ॲबरडीन युकेचे उपप्राचार्य ग्लोबल एंगेजमेंट प्रा. सिलादित्य भट्टाचार्य, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठाच्या उपकुलगुरू गॉय लिटलफेअर, यॉर्क विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. चार्ली जेफ्री, इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी संस्थेचे अध्यक्ष इलिनॉय टेक राज ईचंबाडी  व इस्टिटुटो युरोपियो डी डिझाइनचे रिकार्डो बाल्बो यांना इरादापत्रे दिली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNavi Mumbaiनवी मुंबईMaharashtraमहाराष्ट्र