SSC Result : जुळ्या बहिणींचे गुणही जुळे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 11:53 IST2022-06-18T11:53:15+5:302022-06-18T11:53:38+5:30

SSC Result: दिसायला अन् गुणांतही हुबेहूब अशी किमया साधणाऱ्या अंकिता, निकिता या जुळ्या बहिणींचे दहावी परीक्षेतील गुणही जुळे आहेत.  

SSC Result: Twin sisters' qualities are also twins! | SSC Result : जुळ्या बहिणींचे गुणही जुळे!

SSC Result : जुळ्या बहिणींचे गुणही जुळे!

लातूर : दिसायला अन् गुणांतही हुबेहूब अशी किमया साधणाऱ्या अंकिता, निकिता या जुळ्या बहिणींचे दहावी परीक्षेतील गुणही जुळे आहेत.  
मूळचे कंधार तालुक्यातील कुरळा येथील भरत श्रीरामे चाकूर येथे खासगी नोकरी करतात. त्यांना अंकिता आणि निकिता या दोन जुळ्या मुली आहेत. शुक्रवारी दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर श्रीरामे कुटुंबीय आनंदित झाले. निकालाच्या दिवशी दोघींनी ४३८ (८७.६० टक्के) असे एकसारखे गुण मिळवून सर्वांनाच अचंबित केले.  

Web Title: SSC Result: Twin sisters' qualities are also twins!