शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

SSC & HSC Exams Result: दहावी, बारावीचे निकाल वेळेवरच, विद्यार्थ्यांनी निश्चिंत राहण्याचे शिक्षण मंडळाचे आवाहन   

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 06:13 IST

SSC & HSC Exams Result: राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या बारावीच्या परीक्षा संपल्या आहेत आणि विद्यार्थ्यांना आणि पालकांना आता निकालाचे वेध लागले आहेत.

मुंबई : राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या बारावीच्या परीक्षा संपल्या आहेत आणि विद्यार्थ्यांना आणि पालकांना आता निकालाचे वेध लागले आहेत. मात्र विनाअनुदानित शिक्षकांच्या पेपर तपासणीवरील बहिष्कार आंदोलनामुळे निकालाला लेटमार्क लागणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र हे निकाल वेळेतच लागतील, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे विद्यार्थी पालकांनी चिंता करू नये, असे त्यांनी आवाहन केले आहे.दहावी बारावीच्या परीक्षा संपून विभागीय मंडळात उत्तरपत्रिकांची तपासणी सुरू आहे. आतापर्यंतच्या तपासणीचा आढावा शिक्षण मंडळाने घेतला असता औरंगाबाद वगळता इतर सर्व विभागांमध्ये तपासणीचे काम सुरळीत सुरू आहे. याबाबत विभागीय मंडळाने तशा सूचना ही शिक्षक, मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. मात्र ही एक अंतर्गत प्रक्रिया असून यामुळे निकालास लेटमार्क लागणार नसल्याचे गोसावी यांनी स्पष्ट केले. 

नव्या वर्षातील प्रवेश प्रक्रियाही नियोजनानुसार दहावी आणि बारावीच्या निकालांच्या तारखा राज्य मंडळाकडून अधिकृतरीत्या जाहीर झालेल्या नाही. साधारपणे दरवर्षी १० जूनपर्यंत दहावीचा आणि १५ जूनपर्यंत बारावीचा निकाल लागावा यासाठी मंडळ नियोजन करते. निकाल वेळेत लागल्यास प्रवेशप्रक्रिया पार पडून सर्व महाविद्यालयांचे वर्ग ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान सुरू होतात. यंदा ही मंडळ अशाच प्रकारच्या नियोजनासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे निकाल वेळेवरच लागतील आणि विद्यार्थी पालकांनी निश्चित रहावे, असे आवाहन गोसावी यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :ssc examदहावीHSC / 12th Exam12वी परीक्षाEducationशिक्षणMaharashtraमहाराष्ट्र