शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 10:50 IST

SSC CGL २०२५ Notification: या भरतीअंतर्गत CBI, IB, NIA, नारकोटिक्स...अशा विविध विभाग आणि मंत्रालयांमध्ये नोकरी मिळेल. जाणून घ्या संपूर्ण माहिती.

SSC CGL २०२५ Notification: सरकारी नोकरीची विशेषतः केंद्रीय नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच SSC ने काल(९ जून) रोजी SSC CGL २०२५ भरतीची अधिसूचना आणि अर्ज प्रक्रिया सुरू झाली. पात्र आणि इच्छुक उमेदवार एसएससीच्या (ssc.gov.in) च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन कम्बाइंड ग्रॅज्युएट लेव्हल (CGL) भरतीसाठी अर्ज करू शकतात. 

अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ जुलै २०२५ आहे. या भरती मोहिमेअंतर्गत, केंद्र सरकारच्या विविध विभाग आणि मंत्रालयांमध्ये एकूण १४५८२ पदे भरली जाणार आहेत. विशेष म्हणजे, नेहमीप्रमाणे उमेदवारांकडून फक्त १०० रुपये अर्ज शुल्क आकारले जात आहे. पण, अर्जात दुरुस्ती करण्यासाठी त्यांना ज्यादा शुल्क भरावे लागेल.

उमेदवार आपल्या अर्जात दोनदा सुधारणा करू शकतील. पहिल्या दुरुस्तीसाठी त्यांना २०० रुपये आणि दुसऱ्या दुरुस्तीसाठी ५०० रुपये भरावे लागतील. एसएससीने दिलेल्या माहितीनुसार, सीजीएल परीक्षा १३ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट २०२५ दरम्यान होणार आहे. ही परीक्षा संगणक आधारित चाचणी स्वरूपात घेतली जाईल.

अर्ज कसा भरायचा?

  • सर्वप्रथम SSC ssc.nic.in च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • त्यानंतर होम पेजवर उपलब्ध असलेल्या नोंदणी लिंकवर क्लिक करा.
  • त्यानंतर पोर्टलवर लॉग इन करा आणि SSC CGL 2025 परीक्षेसाठी अर्ज करा.
  • आता सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा, अर्ज शुल्क भरा आणि फॉर्म सबमिट करा.
  • फॉर्म सेव्ह करुन डाउनलोड करा.
  • कन्फर्मेशन पेजची प्रिंटआउट घ्या.

कोणत्या पदांवर भरती केली जाईल?

  • सहाय्यक विभाग अधिकारी - केंद्रीय सचिवालय सेवा, गुप्तचर विभाग (IB), रेल्वे मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, सशस्त्र दल मुख्यालय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, इतर मंत्रालये/विभाग/संघटना
  • आयकर निरीक्षक- केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (CBDT)
  • केंद्रीय उत्पादन शुल्क निरीक्षक- केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ (CBIC)
  • निरीक्षक (प्रतिबंधक अधिकारी)- केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ (CBIC)
  • निरीक्षक (परीक्षक)- केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ
  • सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी- अंमलबजावणी संचालनालय (महसूल विभाग)
  • उपनिरीक्षक- केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI), राष्ट्रीय तपास संस्था (NIA), केंद्रीय नारकोटिक्स ब्यूरो, वित्त मंत्रालय
  • निरीक्षक- टपाल विभाग, संप्रेषण मंत्रालय, केंद्रीय नारकोटिक्स ब्यूरो, वित्त मंत्रालय
  • विभाग प्रमुख- परराष्ट्र व्यापार महासंचालक
  • कार्यकारी सहाय्यक- केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ (CBIC)
  • संशोधन सहाय्यक- राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (एनएचआरसी)
  • विभागीय लेखापाल- नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (कॅग) अंतर्गत कार्यालये
  • उपनिरीक्षक, कनिष्ठ गुप्तचर - नार्कोटिक्स नियंत्रण ब्युरो (एमएचए)
  • कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी- सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
  • सांख्यिकी अन्वेषक, श्रेणी-II- गृह मंत्रालय
  • कार्यालय अधीक्षक- केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (CBDT)
  • लेखापरीक्षक- नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (कॅग) अंतर्गत कार्यालये, CGDA अंतर्गत कार्यालये, इतर मंत्रालये/विभाग
  • लेखापरीक्षक- नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (कॅग) अंतर्गत कार्यालये, लेखा नियंत्रक,
  • लेखापरीक्षक, कनिष्ठ लेखापाल- इतर मंत्रालये/विभाग
  • पोस्टल असिस्टंट/सॉर्टिंग असिस्टंट- पोस्ट विभाग, दळणवळण मंत्रालय
  • वरिष्ठ सचिवालय सहाय्यक/उच्च विभाग लिपिक- केंद्र सरकारची कार्यालये/सीएससीएस कॅडर व्यतिरिक्त इतर मंत्रालये
  • वरिष्ठ प्रशासकीय सहाय्यक- लष्करी अभियांत्रिकी सेवा, संरक्षण मंत्रालय
  • कर सहाय्यक- केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (CBDT), केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळ आणि सीमाशुल्क (CBIC)

पात्रता निकष काय आहेत?

शैक्षणिक पात्रता- कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी आणि सांख्यिकी अन्वेषक (ग्रेड-II) वगळता सर्व पदांसाठी अर्जदारांकडे कोणत्याही विषयात पदवी असणे आवश्यक आहे. तर, कनिष्ठ सांख्यिकी अधिकारीसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर पदवी आणि १२ वी मध्ये गणितात किमान ६० टक्के गुण. याशिवाय, सांख्यिकी अन्वेषक (ग्रेड-II) साठी अर्थशास्त्र, सांख्यिकी किंवा गणितात पदवी (अनिवार्य) किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून पर्यायी पदवी असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा- काही पदांसाठी वयोमर्यादा १८ ते २७ वर्षे, काहींसाठी १८ ते ३० वर्षे, काहींसाठी १८ ते ३२ वर्षे आणि काहींसाठी २० ते ३० वर्षे आहे. OBC, SC आणि ST प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेतही सूट दिली जाईल.

परीक्षेचे स्वरुप?एसएससी सीजीएल परीक्षा टियर-१ आणि टियर-२, अशा दोन टप्प्यात घेतली जाते. टियर-१ परीक्षा पात्रतेसाठी असते, तर टियर-२ परीक्षेतील उमेदवाराच्या एकूण गुणांच्या आधारेच यादी तयार केली जाते. टियर-१ परीक्षा १३ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट दरम्यान घेतली जाईल, तर टियर-२ परीक्षा डिसेंबर २०२५ मध्ये घेतली जाईल.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारjobनोकरीexamपरीक्षाEducationशिक्षण