शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
6
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
7
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
8
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
9
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
10
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
11
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
12
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
13
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
14
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
15
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
16
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
17
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
18
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
19
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
20
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या

विद्यार्थी असावे तर असे! IIT Bombay च्या माजी विद्यार्थ्यांनी संस्थेला दिली 57 कोटींची देणगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2023 20:05 IST

IIT Bombay: अलीकडेच IIT बॉम्बेच्या 1998 च्या बॅचचा गेट टू गेदर सोहळा पार पडला. यावेळी ही देणगी देण्यात आली.

IIT Bombay Alumni: एखाद्या व्यक्तीने मोठ्या पदावर पोहोचल्यानंतर आपल्याला शिकवणाऱ्या शाळा किंवा कॉलेजला देणगी दिल्याचे अनेकदा घडले आहे. IIT बॉम्बे(मुंबई) च्या माजी विद्यार्थ्यांनी तर अनेकदा संस्थेला मोठी रक्कम देणगी स्वरुपात दिली आहे. अलीकडेच IIT बॉम्बेचा रौप्य महोत्सवी गेट-टू-गेदर सोहळा थाटामाटात साजरा झाला. या सोहळ्यात IIT बॉम्बेच्या 1998 सालच्या बॅचने संस्थेसाठी तब्बल 55 कोटी रुपयांहून अधिकची देणगी दिली.

या माजी विद्यार्थ्याचे सर्वाधिक योगदान आयआयटी बॉम्बेच्या 200 हून अधिक माजी विद्यार्थ्यांनी आपल्या कॉलेजला भरभरुन देणगी दिली. या देणगीदारांमध्ये प्रामुख्याने प्रायव्हेट इक्विटी फर्म सिल्व्हर लेकचे व्यवस्थापकीय संचालक अपूर्व सक्सेना,  पीक XV चे व्यवस्थापकीय संचालक शैलेंद्र सिंह, व्हेक्टर कॅपिटलचे एमडी अनुपम बॅनर्जी, एआय रिसर्चचे दिलीप जॉर्ज, गूगल डीपमाइंड, ग्रेट लर्निंगचे सीईओ मोहन लकहमराजू, कोलोपास्ट एसवीपी मनु वर्मा, सिलिकॉन व्हॅलीतील उद्योजग सुंदर अय्यर, इंडोवेंसचे को-फाउंडर आणि सीईओ संदीप जोशी आणि अमेरिकेतील एचसीएलचे मुख्याधिकारी श्रीकांत शेट्टी यांचा समावेश आहे.

संस्थेने काय म्हटले?या देणगीबाबत IIT बॉम्बेचे संचालक सुभाषिस चौधरी म्हणाले की, '1998 च्या बॅचने दिलेल्या योगदानामुळे IIT बॉम्बेच्या वाढीला गती मिळेल आणि संस्थेला सर्वोत्तम बनवण्यासाठी हातभार लागेल. तसेच, माजी विद्यार्थ्यांनी उभारलेला निधी IIT बॉम्बेला मोठ्या शैक्षणिक प्रकल्पांना निधी देण्यास सक्षम करेल. आणि यामुळे संशोधनातही वाढ होईल.' विशेष म्हणजे, 1973 च्या बॅचनेही संस्थेसाठी 7.15 कोटींची देणगी दिली आहे. संस्थेच्या अधिकृत X हँडलवरुन ही माहिती देण्यात आली.

टॅग्स :IIT Mumbaiआयआयटी मुंबईEducationशिक्षणStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालयMumbaiमुंबई