शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पाचपर्यंत पटसंख्या असलेल्या  शाळा बंद होणार नाहीत ! आधीचा आदेश अखेर घेतला मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 05:58 IST

८ ऑक्टोबरच्या शाळा बंद करण्याच्या आदेशानंतर सर्व विभागातील अधिकाऱ्यांकडून तसा आदेश जारी होण्याची भीती शिक्षकांनी व्यक्त केली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अमरावती विभागीय शिक्षण उपसंचालकांनी ८ ऑक्टोबर रोजी शासकीय १ ते ५ विद्यार्थ्यांच्या शाळा बंद करण्याचा आदेश दिला. परंतु ९ ऑक्टोबरला संबंधित अधिकाऱ्यांनी तो मागे घेतला. शिक्षक संघटनांनी हा प्रकार शब्दछळ असल्याचे सांगितले. तर, शिक्षण आयुक्तांनी शाळा बंद करण्याचा शासनाचा कोणताही मानस नसल्याचे स्पष्ट केले.

८ ऑक्टोबरच्या शाळा बंद करण्याच्या आदेशानंतर सर्व विभागातील अधिकाऱ्यांकडून तसा आदेश जारी होण्याची भीती शिक्षकांनी व्यक्त केली. आयुक्तांना त्याबाबत विचारणा केली असता संबंधित अधिकाऱ्याला विचारणा करू, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर तत्काळ संबंधित अधिकाऱ्याकडून शाळा बंदबाबतचा आदेश मागे घेण्यात आला. त्यानंतर  एकाच कॅम्पसमध्ये एकापेक्षा जास्त शाळा असल्यास त्याचे रूपांतर एकाच शाळेत करावे. पाचपर्यंत पटसंख्या असणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे नजीकच्या शाळेमध्ये समावेशन करण्यापूर्वी  भौगोलिक परिस्थितीचा आढावा घ्यावा, असे गुरुवारी काढलेल्या नवीन आदेशात नमूद केले आहे. 

समायोजन नावाखाली शाळा बंद करण्याचा नवीन डाव शिक्षक-मुख्याध्यापक संघटनांनी समजून घ्यावा. शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी खासगीकरणाविरोधात सरळ उभे राहावे, असे आवाहन शिक्षण तज्ज्ञ अरविंद वैद्य यांनी केले. 

‘हा तर शब्दच्छल’; समितीचा आराेपनवीन आदेशात शाळा  ‘बंद’ ऐवजी ‘समावेशन’ असा शब्द आहे.  परंतु हे म्हणजे शब्दच्छल आहे. मात्र दुर्गम ग्रामीण भागात शाळा बंद झाल्यावर दलित आदिवासी भटके मुक्त विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क कसा मिळेल, असा प्रश्न कायम असल्याची टीका राज्य प्राथमिक शिक्षक समितीची चिटणीस विजय कोरेगावकर यांनी केली. 

शिक्षणाचा अधिकार सर्व बालकांना आहे. कमी पट संख्येच्या शाळा बंद करणे, असा शासनाचा उद्देश नाही. अमरावती विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली आहे. त्यांच्याकडून ती चूक झाली होती. आता नवीन आदेश पत्र जारी होत आहे.- सचिंद्र प्रताप  सिंह, आयुक्त, शिक्षण विभाग

English
हिंदी सारांश
Web Title : Schools with low enrollment won't close: Previous order revoked.

Web Summary : Amravati official's school closure order was quickly withdrawn after teacher protests. Education Commissioner clarified no school closure plan exists. New order prioritizes geographical review before merging low-enrollment schools, addressing access concerns for marginalized students. Critics call it a word game.
टॅग्स :Schoolशाळा