शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
3
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
4
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
5
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
6
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
7
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
8
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
9
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
10
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
11
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
12
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
13
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
14
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
15
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
16
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
17
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
18
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
19
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!
20
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   

School: शाळांची घंटा वाजली, ‘मधली सुट्टी’ पुन्हा जिवंत झाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 06:24 IST

School: विवंचनेत असलेल्या प्रश्नांना उत्तरं मिळण्याचं हक्काचं बोलकं व्यासपीठ, म्हणजे शाळेतील मधली सुट्टी...    आधीचे तास पूर्ण होईपर्यंत  घडाळ्याच्या काट्याकडे सर्वांच्याच नजरा लागून असायच्या.

- विवेक म्हस्केविवंचनेत असलेल्या प्रश्नांना उत्तरं मिळण्याचं हक्काचं बोलकं व्यासपीठ, म्हणजे शाळेतील मधली सुट्टी...    आधीचे तास पूर्ण होईपर्यंत  घडाळ्याच्या काट्याकडे सर्वांच्याच नजरा लागून असायच्या. ‘घंटा’ वाजण्याच्या आत, सारं काही उरकून बसायचं आणि एकदाची ‘घंटा’ वाजली की, सारे सवंगडी क्षणार्धात ठरलेल्या रोजच्या ठिकाणी जमा व्हायचे. शाळेत मिळणाऱ्या भाताची एक वेगळीच मजा होती. भात घेण्यासाठी एका सरळ रांगेत, शिस्त न मोडता उभं राहायचं. मग रिंगण करून सर्वांसोबत, गप्पा आणि अनेक किस्से सांगत जेवण करायचं. तेव्हा या जगात आपण किती हरवलो होतो, हे आज कळलं. नव्याने सुरू झालेल्या शाळेत सहज गेलो असता, पुन्हा बालपण जागं झालं.

नुकतीच मधली सुट्टी होऊन मुले जेवणासाठी जमली होती. त्यांच्या किलबिलत्या घोळक्यात चाललेली प्रत्येक गोष्ट कटाक्षाने मी टिपत होतो. बघता बघता मी त्यात कधी रमून गेलो, कळलंही नाही.

खरं तर शाळेतली मधली सुट्टी ही जेवणासाठी असायची. मात्र, त्या वेळामध्ये आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी जगल्याचा आणि जपल्याचा आनंद अजून माझ्या मनाशी आहे.  गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संसर्गामुळे सारंच जग विस्कळीत झालं होतं. आता परिस्थिती निवळताच सुटकेचा निःश्वास घेत, शाळांना पुन्हा जिवंतपणा आला आहे.  रिकाम्या भकास वर्गखोल्या, मोकळ्या भिंती, बंद दरवाजे... सारं ओसाड असल्यासारखं रूप शाळांना आलं होतं. खूप खूप दिवसांनी  पाठीवर दप्तर घेऊन, मुलांनी शाळेची वाट धरली आहे. मोबाईलमध्ये गुंतलेली डोकी आता भिंतीवरील फळ्यांकडे वळली आहेत. शाळेतील प्रार्थना, राष्ट्रगीताने परिसरात पुन्हा चैतन्य निर्माण होत आहे. पुस्तकं चाळून कविता, गाण्यांचं पाठांतर आता पुन्हा मुलांच्या ओठांवर खेळू लागणार, याचा आनंद आहे.

वास्तव जीवनाशी जुळवून घेण्याची कितीतरी कौशल्ये शाळेतच तर मिळतात! आता मोबाईलला सुट्टी देत मुलांनी शाळेची वाट धरत तोच उत्साह कायम ठेवला आहे.  मुलांच्या विकासासाठी शाळा चालू होणं फार फार महत्त्वाचं होतं. शाळा पुन्हा एकदा किलबिलू लागल्या आहेत. देवा, या सुंदर देखण्या चित्राला पुन्हा त्या कोरोनाची नजर लागू देऊ नकोस!

टॅग्स :SchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्र